वाहतूक पोलीस जेव्हा हाती झाडू घेतात़़़
By Admin | Updated: October 27, 2014 23:41 IST2014-10-27T23:41:10+5:302014-10-27T23:41:10+5:30
कारवाईचा बडगा उचलण्यासाठी सज्ज असलेली यंत्रणा तेवढी डोळ्यासमोर येत़े मात्र कळंबोलीमधील नागरिकांना सोमवारी वाहतूक पोलिसांच्या कामाचा वेगळा अनुभव आला.

वाहतूक पोलीस जेव्हा हाती झाडू घेतात़़़
नवी मुंबई : वाहतूक पोलीस म्हटले की नियम मोडणा:या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उचलण्यासाठी सज्ज असलेली यंत्रणा तेवढी डोळ्यासमोर येत़े मात्र कळंबोलीमधील नागरिकांना सोमवारी वाहतूक पोलिसांच्या कामाचा वेगळा अनुभव आला. रोज वाहनचालकांवर कारवाई करणा:या वाहतूक पोलिसांना चक्क रस्त्यावर झाडू मारताना पाहून सर्वजणच चकित झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ही मोहीम राबविण्यात आली.
मुंबईहून पुण्याकडे जाताना कळंबोलीजवळील एका हॉटेलमध्ये मोठय़ा प्रमाणात नागरिक थांबतात, मात्र या वेळी हॉटेलमधून बाहेर पडताच त्या ठिकाणचा कचरा रस्त्यावर टाकला जातो, तसेच याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला गाडय़ा पार्क करून अनधिकृत पार्किगही केली जाते. कळंबोली वाहतूक पोलिसांनी अनधिकृत करणा:या वाहनांवर कारवाई करीत गांधीगिरी पद्धतीने स्वच्छता मोहीम राबविली.
या वेळी कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप गिरीधर व त्यांच्या दहा कर्मचा:यांनी हाती झाडू घेत परिसर स्वच्छ केला. (प्रतिनिधी)
च्पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियान हा अतिशय स्तुत्य उपक्र म आहे. भारताचे नागरिक म्हणून आमचेही यामध्ये योगदान असावे, या हेतूने आम्ही ही मोहीम राबविली आहे. आमच्या घाईगडबडीच्या वेळातून आम्हाला जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा आम्ही या उपक्र मात हक्काने सहभाग घेऊ, अशी प्रतिक्रि या कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप गिरीधर यांनी व्यक्त केली.