शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

गहू, तांदूळ उत्पादकांनाही बसताेय फटका; निर्यातबंदीमुळे २८,६५५ कोटींचे नुकसान; देशासाठी चिंताजनक बाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 09:15 IST

रशिया-युक्रेन युद्धानंतर जगभर भारतीय गव्हाला प्रचंड मागणी वाढली होती.

 नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वर्षभरातील  निर्यातबंदीचा कांदा उत्पादकांबरोबरच गहू व तांदूळ उत्पादकांना प्रचंड फटका बसला आहे. गव्हाची निर्यात तब्बल २६ पट घसरली असून वर्षभरात ४५ लाख टन कमी निर्यात झाली. त्यामुळे ११३७७ कोटींचे नुकसान झाले. तांदळाचीही ७७ लाख टन निर्यात कमी होऊन १७२७८ कोटींचे नुकसान झाले. अन्नधान्यांच्या निर्यातीमधील घट शेतकऱ्यांसाठी व देशासाठीही चिंताजनक समजली जात असून एकूण २८६५५ कोटींचे नुकसान झाले आहे.  कृषिप्रधान भारताचा अन्नधान्यांच्या निर्यातीमधील वाटा २०२३-२४ या आर्थिक वर्षात कमी झाला आहे. एप्रिल ते फेब्रुवारीदरम्यान अपेडाकडून  उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार गहू, तांदळाच्या निर्यातीमध्ये प्रचंड घट झाल्याचे पाहावयास मिळत आहे. 

रशिया-युक्रेन युद्धानंतर जगभर भारतीय गव्हाला प्रचंड मागणी वाढली होती. २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताने ७२ लाख ३९ हजार टन गहू निर्यात केला. १५८४० कोटींची उलाढाल झाली होती. पण २०२२-२३ मध्ये निर्यात घटून ४६ लाख ९३ हजार टन झाली. उलाढालही ११८२६ कोटीपर्यंत खाली आली. २०२३-२४ या आर्थिक वर्षात देशात गव्हाचा तुटवडा होईल या भीतीने निर्यातीवर निर्बंध टाकण्यात आले. यामुळे आर्थिक वर्षातील ११ महिन्यांत निर्यात २६ टक्क्यांनी घटून १ लाख ७९ हजार टनांवर आली. उलाढालही फक्त ४४९ कोटी रुपये झाली आहे. गहू निर्यातीमधील ही घसरण अत्यंत चिंताजनक समजली जात आहे. 

 भारतीय तांदळालाही जगभर मागणी आहे. २०२२ -२३ मध्ये १ कोटी ७७ लाख टन तांदूळ निर्यात केला होता. निर्यातीमधून ५१०८८ कोटींची उलाढाल झाली. २०२३-२४ वर्षात निर्यात १ कोटी टन झाली आहे. तांदळाला जगातील १५० देशांमधून मागणी आहे. बिगर बासमती तांदळावरील निर्बंधामुळे या निर्यातीमध्येही घट झाली आहे. 

बिगर बासमती तांदूळ निर्यात         वर्ष         निर्यात( टन )      किंमत(कोटी)२०२० - २१         १३०९५१३०          ३५४७६२०२१ - २२          १७२६२२३५          ४५६५२२०२२ - २३          १७७८६०९२          ५१०८८२०२३ - २४          १००८१०५७         ३३८१०

 गहू निर्यातीचा तपशील         वर्ष             निर्यात (टन )      किंमत (कोटी)२०२०  - २१          २०८८४८७          ४०३७२०२१  -  २२          ७२३९३६६          १५८४०२०२२  - २३          ४६९३२६४          ११८२६२०२३  - २४         १७९८१७         ४४९

टॅग्स :Farmerशेतकरी