पाठिंब्याच्या बदल्यात बविआला काय?

By Admin | Updated: November 11, 2014 23:13 IST2014-11-11T23:13:19+5:302014-11-11T23:13:19+5:30

भाजपा-सेनेत सध्या तू तू मैं मै सुरू असल्यामुळे अपक्ष आमदारांचा भाव वधारला आहे. सेनेशी फारकत झाली तर अपक्ष व अन्य आमदारांच्या मदतीने फडणवीस सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार आहे.

What is Bavia in return for support? | पाठिंब्याच्या बदल्यात बविआला काय?

पाठिंब्याच्या बदल्यात बविआला काय?

दीपक मोहिते ल्ल वसई
भाजपा-सेनेत सध्या तू तू मैं मै सुरू असल्यामुळे अपक्ष आमदारांचा भाव वधारला आहे. सेनेशी फारकत झाली तर अपक्ष व अन्य आमदारांच्या मदतीने फडणवीस सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार आहे. बहुजन विकास आघाडीने यापुर्वीच आपल्या तीन आमदारांचा पाठींबा फडणवीस सरकारला जाहीर केला आहे. सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात बहुजन विकास आघाडीने परिसरातील विकासाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
फडणवीस सरकार उद्या (12 नोव्हें.) विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून सेना व भाजपात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपा अन्य पक्ष आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवण्याच्या प्रय}ात आहे. त्यांच्या या प्रय}ाला बहुजन विकास आघाडीकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आघाडीचे अध्यक्ष व वसईचे आ. हितेंद्र ठाकूर, नालासोपा:याचे आ. क्षितीज ठाकूर व बोईसरचे आ. विलास तरे या तिघांचा पाठिंबा आधीच भाजपाला मिळाला आहे. राज्यातील एकंदरीत राजकीय परिस्थिती लक्षात घेता फडणवीस सरकार या तीनही मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावतील तसेच या तिघांपैकी एका आमदाराला मंत्रीमंडळात स्थान मिळून राज्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. परंतु आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचा भर पद मिळवण्यापेक्षा तीनही मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यावर आहे.उद्याच्या विश्वासदर्शक ठरावानंतर मुख्यमंत्री फडणवीस कोणता निर्णय घेतात याकडे वसईकरांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: What is Bavia in return for support?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.