पनवेलच्या महापौरांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 02:05 IST2019-06-14T02:04:54+5:302019-06-14T02:05:10+5:30
शाळेचा पहिला दिवस : शैक्षणिक वाटचालींसाठी दिल्या शुभेच्छा

पनवेलच्या महापौरांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
पनवेल : शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांसाठी उत्सुकतेचा व आनंदाचा दिवस असतो. गुरुवारी नवीन पनवेलमधील शांतिनिकेतन पब्लिक शाळेच्या पहिल्याच दिवशी खुद्द महापौरांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे आयोजन ‘लोकमत’च्या सहकार्याने करण्यात आले होते.
आठवी इयत्तेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी स्वागत केले. या वेळी महापौरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक सचिन आवले यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि जवळपास ८० विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.