वजनकाटय़ाला वजन येणार!
By Admin | Updated: November 27, 2014 22:34 IST2014-11-27T22:34:07+5:302014-11-27T22:34:07+5:30
इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे न वापरण्याच्या निषेधार्थ रायगडसह इतर पाच जिल्हय़ातील मासेमारी नौकांवरील खलाशांनी मासेमारीबंदीचे आंदोलन सुरू केले होते.

वजनकाटय़ाला वजन येणार!
उरण : मासळी विकत घेणा:या व्यापारी वर्गाकडून इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे न वापरण्याच्या निषेधार्थ रायगडसह इतर पाच जिल्हय़ातील मासेमारी नौकांवरील खलाशांनी मासेमारीबंदीचे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनावर आता तोडगा निघण्याची चिन्हे आहेत. मासेमारांच्या या आंदोलनात हस्तक्षेप करीत महाराष्ट्राच्या वैध मापन शास्त्र नियंत्रकांनी अचूक मोजमापासाठी इलेक्ट्रॉनिक काटेच मासळी खरेदीदारांनी वापरावेत, असा आदेशच आज दिला. मात्र या आदेशाची अंमलबजावणी चालू झाल्याशिवाय मासेमारी न करण्याचा निर्धार मासेमारी नौकांवर काम करणा:या खलाशांनी केला आहे. याबाबत शासनस्तरावर उद्या याबाबत एका बैठकीचे आयोजन केल्याची माहिती करंजा मच्छीमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी दिली.
मुंबईच्या ससून डॉक बंदरातच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणो आणि मुंबई अशा पाच जिल्हय़ातील हजारो मासेमारी नौकांनी आणलेल्या मासळीचा लिलाव होतो. महिन्याकाठी कोटय़ावधी रुपयांची उलाढाल असलेल्या या व्यवसायामध्ये मासेमारी बांधव आणि मासेमारी नौकांमध्ये काम करणारे खलाशी अगदी जिवावर उदार होऊन खोल समुद्रात मासेमारीसाठी जातात. वाढते प्रदूषण, मासेमारी व्यवसायासाठी येणारा खर्च आणि त्यातून मिळणारी मिळकत यांची तोंडमिळवणी करताना मासेमारांना समस्या येत आहेत. त्यातच मासेमारी नौकेसाठी काढल्या जाणा:या कर्जाचे हप्तेही भरावे लागतात. या व्यवसायामध्ये मासेमारी नौकेचा मालक, खलाशी आणि सारंग (तांडेल) यांच्यात काही टक्केवारीप्रमाणो मासळीच्या विक्रीतून येणा:या रक्कमेचे वाटप होते.
वजन काटय़ाच्या माध्यमातून लूट होत असल्याचे समोर आल्याने मासेमार आणि खलाशांनी मासळी मोजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटेच वापरावेत ही मागणी लावून धरली. गेल्या दहा दिवसापासून ससून डॉक बंदरात लागणा:या सर्व मासेमारी नौकांनी मासेमारी बंद केली होती. या आंदोलनाची सुरुवात खलाशांनीच केल्याने मासेमारी नौका मासळीसाठी जाऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे ससून डॉक बंदरात शेकडो मासेमारी नौका नांगरुन ठेवण्यात आल्या आहेत. मासेमारीसाठी गेलेल्या मासेमारी नौकांनाही मध्यंतरीच्या काळात माघारी बोलावून हे आंदोलन चालू ठेवण्यात आले होते. (वार्ताहर)
व्यापा:यांना आदेश
च्महाराष्ट्र राज्याचे वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक संजय पांडय़े यांच्या सहीने मच्छिमारांकडून मासळी विकत घेणा:या व्यापारी व खरेदीदारांसाठी एक आदेशच देण्यात आला.
च् मासळी विकत घेताना व्यापारी व खरेदीदार यांनी मासळी विकत घेताना वर्ग 3 नुसार अचुकतेच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचाच वापर करण्याचे बंधनकारक केले आहे.
च्निर्यातदारांनीही हे मासळी विक्रेते किंवा खरेदीदार दलाल यांच्याकडून निर्यातीसाठी मासळी खरेदी करताना वर्ग 3 नुसार अचुकतेच्या इलेक्ट्रॉनिक्स तोलन उपकरणांचाच वापर करणो बंधनकारक आहे. या आदेशाचे उल्लंघन करणा:यांवर कारवाई केली जाणार आहे.