शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
2
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
3
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
4
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
5
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
6
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
7
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
8
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
9
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
10
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
11
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
12
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
13
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
14
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
15
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
16
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
17
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
18
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
19
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
20
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद

नवी मुंबईत निवडणुकीच्या तोंडावर शस्त्रांचा बाजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 11:12 IST

पाच पिस्तुले हस्तगत : तीन सराईत आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : अवैधरित्या पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तिघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. पनवेल व नेरुळ रेल्वेस्थानक परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. यावेळी आरोपींकडून ५ पिस्तूल व ६ काडतुसे हस्तगत केली असून, अटक केलेल्यांमधील दोघे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. ही पिस्तूल कोणाला विकली जाणार होती? त्याचा आगामी महापालिका निवडणुकांशी संबंध आहे का? याचाही अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.

शहरात गुन्हेगारी कृत्ये वाढत असून, ती नियंत्रणात आणण्यासाठी गुन्हे शाखेकडून प्रयत्न सुरू आहेत. यादरम्यान पनवेल रेल्वेस्थानक परिसरात अग्निशस्त्र बाळगणारी व्यक्ती येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष २ चे वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे यांना मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप गायकवाड, प्रवीण फडतरे, उपनिरीक्षक मानसिंग पाटील, वैभव रोंगे, हवालदार अनिल पाटील, ज्ञानेश्वर वाघ, प्रशांत काटकर यांचे पथक तयार केले होते. त्यांनी मागील आठवड्यात पनवेल स्थानक परिसरात सापळा रचला होता. यावेळी पळून जाण्याच्या तयारीत असताना गोपाळ राजपाल भारद्वाज (२२) याला ताब्यात घेतले. यावेळी घेतलेल्या अंग झडतीमध्ये त्याच्याकडील बॅगमध्ये ४ पिस्तूल व ४ काडतुसे आढळली. तो मूळचा उत्तर प्रदेशचा असून, ही शस्त्रे घेऊन विक्रीसाठी नवी मुंबईत आला होता. याचदरम्यान नेरुळ रेल्वेस्थानक परिसरात काहीजण पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. त्यामुळे वरिष्ठ निरीक्षक विजयसिंग भोसले यांनी उपनिरीक्षक संजय रेड्डी, हवालदार मंगेश वाट, नितीन जगताप, किरण राऊत, लक्ष्मण कोपरकर, अजय कदम यांचे पथक केले होते.

सापळ्यात शारून उर्फ कुन्निकृष्णन सापळ्यात शारून उर्फ कुन्निकृष्णन शालिनी हा १ पिस्तूल व दोन काडतुसांसह पोलिसांच्या हाती लागला. हे पिस्तूल त्याने कऱ्हाडमधील अल्तमेश उर्फ मोन्या तांबोळी याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. त्यानुसार पथकाने कऱ्हाड येथून मोन्याला अटक केली आहे. तो सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर कऱ्हाड व लगतच्या परिसरात आर्म्स ॲक्टचे ५ गुन्हे दाखल आहेत. दोन्ही पथकांनी पाच पिस्तूल हस्तगत केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, सहआयुक्त डॉ. जय जाधव, अतिरिक्त आयुक्त महेश घुर्ये यांनी या कारवाईचे कौतुक केले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNavi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी