शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

मेट्रोसह पंतप्रधान आवासमुळे श्रीमंत सिडकोला घरघर; हवे सहा हजार कोटी रुपये कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 08:35 IST

वित्तपुरवठादारांंचा शोध सुरू

- नारायण जाधव ठाणे : राज्यातील सर्वाधिक श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहर आणि औद्योगिक विकास अर्थात सिडको महामंडळास अलीकडे अब्जावधींच्या खर्चाचे मोठेमोठे विकास प्रकल्प हाती घेतल्याने आर्थिकदृष्ट्या घरघर लागली आहे. यामुळेच की काय १९ हजार कोटी खर्चून बांंधण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेची ९० हजार घरे आणि कूर्म गतीने सुरू असलेल्या मेट्रो मार्ग क्रमांक १ साठी सिडकोस ६ हजार कोटींचे  कर्ज हवे  आहे. त्यासाठी वित्तपुरवठा करणाऱ्या बँका व तत्सम संस्थांचा सिडकोने शोध सुरू केला आहे.यात अनेक वर्षांपासून रेंगाळत सुरू असलेल्या आणि सध्या अंतिम टप्प्यात आलेल्या बेलापूर ते पेंधर-तळोजा या ११ किमीच्या मेट्रो मार्गांच्या विकासासाठी सिडकोस १ हजार कोटींचे कर्ज हवे आहे. तर लोकसभा निवडणुकीआधी कोणत्याही परवानग्या नसताना ही अत्यंत घाईघाईत भूमिपूजन उरकलेल्या ९० हजार घरांच्या  पंतप्रधान आवास योजनेच्या बांधकामासाठी सिडकोस ५ हजार कोटींचे कर्ज हवे आहे. नवी मुंबईत वाशीतील ट्रक टर्मिनल, सानपाडा, जुईनगर रेल्वे स्थानकाचे फोर्टकोर्ट एरिया, पनवेल, कळंबोलीतील बसस्थानकांच्या जागेसह तळोजात सिडको  जागेच्या वापरात बदल न करताच ही ९० हजार घरे बांधत आहे. यात ५३ हजार ४८३ घरे आर्थिकदृष्ट्या कमी उत्पन्न गटासाठीची तर ३६ हजार २८८ घरे अल्प उत्पन्न गटासाठीची आहेत. यावर सुमारे १९ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.सिडको एक श्रीमंत महामंडळ म्हणून परिचित असून तिच्या दहा हजार कोटींहून अधिक ठेवी होत्या. परंतु, अलीकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सी लिंक परिसरातील  रस्ते, नैना क्षेत्रातील रस्ते, मल वाहिन्यांची कोट्यवधींची कामे सिडकोने हाती घेतली आहेत. तसेच राज्य मंत्रिमंडळातील एका युवराजाच्या बालहट्टासाठी खारघर येथे एकाच ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्चून चार फुटबॉल स्टेडियम सिडको बांधत आहे. शिवाय यापूर्वी सिडकोने समृद्धी महामार्गासाठी रस्ते विकास महामंडळास हजार कोटींचे कर्ज दिले होते. कालांतराने विद्यमान महाविकास आघाडी सरकारने या कर्जाचे समभागात रूपांतर केल्याने ते बुडीत निघाले आहे. संबंध नसतानाही बांधली कोविड केअर सेंटरकोविड काळात काहीही संबंध नसतानाही सिडकोने ठाणे, मुलुंड येथे काेविड केअर सेंटर बांधली आहेत. यामुळे सिडकोची आर्थिक स्थिती खालावत चालली आहे. यामुळे आता आपल्या मेट्रो, पंतप्रधान आवास योजनेच्या घरांसाठी ६ हजार कोटींचे कर्ज घेण्याची नामुष्की सिडकोवर ओढावली आहे. यासाठी ९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत वित्तसंस्थांनी कोणत्या दराने कर्ज देणार याचे देकार सिडकोस सादर करायचे आहेत.

टॅग्स :cidcoसिडको