केएलई महाविद्यालयात पाणीबचतीचे धडे

By Admin | Updated: May 28, 2016 02:56 IST2016-05-28T02:56:34+5:302016-05-28T02:56:34+5:30

पाणीटंचाईवर बचतीची उपाययोजना व्हावी याकरिता ‘लोकमत’ने जलमित्र अभियान हाती घेतले आहे. उपाहारगृह, सोसायट्यांबरोबर आता शाळा आणि महाविद्यालयात सुध्दा पाणीबचतीचा

Water-saving lessons at KLE College | केएलई महाविद्यालयात पाणीबचतीचे धडे

केएलई महाविद्यालयात पाणीबचतीचे धडे

कळंबोली : पाणीटंचाईवर बचतीची उपाययोजना व्हावी याकरिता ‘लोकमत’ने जलमित्र अभियान हाती घेतले आहे. उपाहारगृह, सोसायट्यांबरोबर आता शाळा आणि महाविद्यालयात सुध्दा पाणीबचतीचा संदेश देण्यात येत आहे. शुक्र वारी येथील के.एल.ई. महाविद्यालयात पाण्याचा अपव्यय टाळणे तसेच बचतीचे धडे देण्यात आले. ‘लोकमत’च्या या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाच त्याचबरोबर पाणीबचतीचा संकल्प करण्यात आला.
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर लोकमत जलमित्र हे अभियान अतिशय प्रभावीपणे राबवत आहे. शुक्रवारी कळंबोली येथील के.एल.ई. महाविद्यालयात जलमित्र अभियानांतर्गत जनजागृती करण्यात आली. पाणी हे जीवन असून पाऊस कमी पडल्याने टंचाई निर्माण झाली. ही नैसर्गिक आपत्ती असून त्याला केवळ सिडकोच किंवा इतर यंत्रणा जबाबदार नाही. टंचाईवर मात्र म्हणून बचत करणे ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. म्हणून आम्ही तत्कालीन पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या उपस्थितीत डिसेंबरमध्ये विद्यार्थ्यांमध्ये पाणीबचतीचे प्रबोधन केले. त्याचबरोबर त्यांना याबाबत जागृती करण्याचे आवाहन केले. सामाजिक बांधिलकी या नात्याने के.एल.ई.ने बऱ्यापैकी जागृती केली असल्याचे प्राचार्य डॉ. ज्योती मारवा यांनी सांगितले. पाऊस कमी पडल्यामुळे या वर्षी पाण्याची प्रचंड कमतरता भासली ही वस्तुस्थिती सगळ्यांनाच मान्य करावी लागेल. पाणीटंचाई भासू नये याकरिता सिडकोने प्रयत्न केले त्याचबरोबर सोसायट्यांमध्ये पाण्याचा अपव्यय टाळण्याकरिता जनजागृती सुध्दा केली असे किरण फणसे यांनी सांगितले. लहान मुले आणि घरकाम करणाऱ्या महिला पाण्याची नासधूस जास्त करतात यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रबोधन व्हावे असे फणसे यांनी मत व्यक्त केले. आपण साताऱ्यातील माण-खटाव तालुक्यातील मूळ रहिवासी आहे. येथे दुष्काळजन्य परिस्थिती असते. त्यामुळे पाण्याचे महत्त्व किती आहे याची जाण लहानपणापासूनच आहे. जमीन आमच्याकडे खूप आहे पण पाणी नसल्याने ती फुलवता किंवा पिकवता येत नसल्याची खंत सहाय्यक पोलीस निरीक्षक अरूण पवार यांनी व्यक्त केली. यावेळी महाविद्यालयाचे संचालक एस.एन. शेट्टी, प्राचार्या डॉ. ज्योती मारवा, शिवसेनेचे विधानसभा संघटक दीपक निकम, सिडकोचे अधीक्षक अभियंता किरण फणसे, कफचे अरूण भिसे, एमएनआरचे संचालक श्रवण, लक्ष्मी आय क्लिनिकचे वरिष्ठ व्यवस्थापक सचिन भूमकर, सुरेश महेश्वरी,सहाय्यक पो. नि. अरूण पवार, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता आशिष खोब्रागडे, प्रा. ईल्ला अथिया उपस्थित होते.

Web Title: Water-saving lessons at KLE College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.