शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही पाण्याची समस्या ही गंभीर बाब- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 07:00 IST

व्हावा शेवा टप्पा ३च्या पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन

पनवेल : देशाला स्वातंत्र्य मिळून  ७५ वर्षांचा काळ लोटला आहे. तरी अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याची खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पनवेल येथे सोमवारी व्यक्त केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या व्हावा शेवा टप्पा तीन पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कालच (रविवारी) मी नागरिकांना कोरोनाबाबत सतर्कता बाळगण्याचे सांगत करीत गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. मात्र नागरिकांच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची योजना असल्याने मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

एकीकडे माणूस चंद्रावर पाणी सापडते का ? याबाबत संशोधन करीत आहे. मात्र यापेक्षा आपण ज्या जमिनीवर राहतो तेथील लोकांना मुबलक पाणी उपलब्ध कसे होईल याकरिता प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. रायगड जिल्ह्यात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. पिण्याचा पाण्याची व्यवस्था आपण केली नाही, तर भविष्यात गंभीर समस्या निर्माण होतील, असे मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडले. लॉकडाऊन हे शासनाला परवडणारे नाही. जनतेने कोरोनाचे नियम पाळल्यास पुन्हा लॉकडाऊनची गरज भासणार नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

भविष्यात पाण्यासाठी देशात युद्ध निर्माण होतील. पाण्याचे वाद देशावरून, राज्यात, राज्यातून जिल्ह्यात व त्यांनतर गावोगावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने पाणी हेच जीवन असल्याचे लक्षात घेऊन त्यानुसार नियोजन करण्याची आवश्यकता आहे. याकरिता पाण्याची काटकसर करण्याची गरज आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, मंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री अदिती तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता पारधी, डॉ. कविता चौतमोल यांच्यासह रायगड जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. 

अशी असेल योजना

व्हावा शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेमुळे सिडको, जेएनपीटी, पनवेल महानगरपालिका, एमएमआरडीए आदी प्राधिकरणांना मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. या योजनेअंतर्गत ५५९ मिमी ते १९५० मिमी व्यासाची व एकूण ३६.११ किलोमीटर लांबीची पोलादी जलवाहिनी टाकण्यात येत आहे. कळंबोली ते रोहिंजन दरम्यान पाणीपुरवठा व्यवस्था नसलेल्या भागात ९.६० किलोमीटर लांबीची नव्याने जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. योजना  पूर्ण करण्यासाठी ३० महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यांनतर संबंधित कंत्राटदाराकडूनच एक वर्ष या प्रकल्पाची देखरेख केली जाणार आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारpanvelपनवेल