कामोठेतील पाण्याचे गणित सुटणार !
By Admin | Updated: December 9, 2015 00:59 IST2015-12-09T00:59:21+5:302015-12-09T00:59:21+5:30
गेली कित्येक महिने सुरू असलेल्या कामोठेवासीयांच्या पाणीप्रश्नावर अखेर तोडगा निघाला असून मंगळवारी कामोठेतील रहिवाशांनी सिडकोच्या

कामोठेतील पाण्याचे गणित सुटणार !
नवी मुंबई : गेली कित्येक महिने सुरू असलेल्या कामोठेवासीयांच्या पाणीप्रश्नावर अखेर तोडगा निघाला असून मंगळवारी कामोठेतील रहिवाशांनी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांशी या समस्येवर चर्चा केली.
बैठकीत पाणी वाटपाचे चुकलेले गणित सोडवून कामोठेतील प्रत्येक विभागात समान पाणी वाटप केले जाणार असल्याची माहिती या बैठकीत दिली. यावेळी पाण्याची ही गंभीर समस्या सोडविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी कामोठेवासियांसह सकारात्मक चर्चा केली.
कामोठेच्या लोकसंख्येनुसार ४२ एमएलडी पाण्याची आवश्यकता असूनही २४ एमएलडी पाणी पुरविण्यात येत असल्याने गेल्या कित्येक महिन्यांपासून कामोठेतील नागरिकांना पाण्याच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. टँकर लॉबीलाही या ठिकाणी बंदी आल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.
नागरिकांनी पाणी समस्येवर अनेकदा सिडकोला घेराव घातला, अधिकाऱ्यांशी चर्चा केली तरी प्रश्न आणखीनच चिघळत गेला. या ठिकाणी सिडकोच्या वतीने २७ नवीन प्रकल्प उभारणार आहे. सद्यस्थितीत नागरिकांना वापरासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नाही तर नव्याने येणाऱ्या प्रकल्पासाठी पाणी कुठून येणार? असा प्रश्नही नागरिकांनी सिडको प्रशासनाला विचारला.
सिडकोचे अधीक्षक अभियंता रमेश गिरी यांनी या पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी सहा उपाययोजना सुचविल्या. पाणीकपातीचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन गिरी यांनी दिले. पंपिंग सिस्टीम सुधारण्याकरिता विशेष पाहणी केली जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)