शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

नवी मुंबई शहरवासीयांवर पाणीकपातीचे संकट, महापालिकेचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 02:29 IST

नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या मोरबे धरण क्षेत्रात जून महिन्यात गेल्यावर्षीपेक्षा या वर्षी असमाधानकारक कमी पाऊस झाला आहे.

- योगेश पिंगळेनवी मुंबई -  नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या मोरबे धरण क्षेत्रात जून महिन्यात गेल्यावर्षीपेक्षा या वर्षी असमाधानकारक कमी पाऊस झाला आहे. कमी झालेल्या पावसामुळे शहरावर पाणीसंकट ओढवू नये यासाठी पाणीकपात करण्याचे संकेत महापालिकेच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.नवी मुंबई शहरात मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जून महिन्यात विजांच्या कडकडाटात सुरु वात झालेल्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे शहरावर पाणीकपातीचे संकट उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणाची पाणीसाठा करण्याची क्षमता १९0.८९ दशलक्ष घनमीटर असून, दररोज ३८0 ते ३९0 एमएलडी पाणीसाठ्याची शहराला गरज आहे. गेल्यावर्षी पावसाळ्यात पूर्णपणे भरलेल्या मोरबे धरणात ५८.६७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक असून, शिल्लक पाणीसाठा शहराला सुमारे १0 सप्टेंबरपर्यंत पुरणार आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात मोरबे धरण क्षेत्रात ८८0 मिलीलिटर इतका पाऊस झाला होता. यावर्षी जून महिन्यातील अवघे काही दिवस शिल्लक असून जून महिन्यात आतापर्यंत केवळ ६२ मिलीलीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात अपेक्षित पाणीसाठा जमा न झाल्याने शहरात पाणीकपातीचे महापालिकेने संकेत दिले आहेत. त्यामुळे नवी मुंबईकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.नासाडी थांबविण्यासाठी पथकाची नेमणूकनवी मुंबई शहरात पाण्याचे संकट येऊ नये यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या कंत्राटदारांमार्फत पथक नेमण्यात येणार असून पाण्याची नासाडी थांबविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.मोरबे धरण क्षेत्रात मागील वर्षी जून महिन्यात झालेल्या पावसाच्या तुलनेत या वर्षी जून महिन्यात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जून महिन्याच्या सरासरीमध्ये धरणाची पातळी सुमारे चार मीटरपेक्षा कमी असून पावसाची परिस्थिती पाहून या आठवड्यात काही प्रमाणात पाणीकपात करण्याबाबत निर्णय घेणार आहोत.- डॉ.रामास्वामी एन.,महापालिका आयुक्त

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाई