शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

शहरात जागोजागी कचरा , पनवेलमध्ये आरोग्याचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 7:10 AM

पनवेल महापालिका हद्दीतील सिडको नोडमध्ये कचराप्रश्न गंभीर बनला आहे. गुरुवारपासून सिडकोने कचरा उचलणे बंद केल्याने सिडको वसाहतीत सर्वत्र कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सिडकोकडून आतापर्यंत कचरा हस्तांतरणाला दोन ते तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

- वैभव गायकरपनवेल : पनवेल महापालिका हद्दीतील सिडको नोडमध्ये कचराप्रश्न गंभीर बनला आहे. गुरुवारपासून सिडकोने कचरा उचलणे बंद केल्याने सिडको वसाहतीत सर्वत्र कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सिडकोकडून आतापर्यंत कचरा हस्तांतरणाला दोन ते तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, प्रभावी यंत्रणा उभी करण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आल्याचा गंभीर आरोप सत्ताधाºयांकडून करण्यात येत आहे.महापालिका क्षेत्रात खारघर, कळंबोली, कामोठे, खांदा वसाहत, नवीन पनवेल, तळोजा आदी अनेक ठिकाणी कचरा साचला आहे. कचरा हस्तांतरणाचा ठराव सत्ताधारी भाजपाने सभागृहात पारित केला आहे. त्यानंतर सिडको हा कचरा पालिकेकडे हस्तांतरण करणार, हे निश्चित झाले होते. १ फेब्रुवारी रोजी सिडकोने कचरा उचलणे बंद केल्यानंतर पालिका प्रशासन यासंदर्भात उपाययोजना राबवून कचरा उचलणे अपेक्षित होते. मात्र, पालिकेकडून कचरा उचलण्यास टाळाटाळ केली जात आहे. वसाहतीतील रहिवाशांकडूनही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.एकीकडे पनवेल महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षणाची जोरदार जाहिरात केली जात असताना, कचरा समस्येमुळे शहराची प्रतिमा मलीन होत आहे. सभागृहनेते परेश ठाकूर यांनी, महापालिकेकडून यासंदर्भात चालढकल करण्यात येत आहे. पालिका प्रशासन केवळ दिखावेगिरी करीत असून, सर्वसामान्य नागरिकांच्या संतापाला आम्हाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे.सध्या महापालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत पथनाट्य, जनजागृती, भिंती रंगवणे आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. सर्वेक्षण होईपर्यंत सिडकोकडून कचरा उचलण्यात यावा, अशी मागणी महापालिकेकडून करण्यात आल्याने कचरा हस्तांतरणाचा विषय आणखी दीड महिना लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शहरातील कचरा उचलला नाही, तर सिडकोच्या दारात टाकू, असा इशारा नगरसेवक हरेश केणी यांनी दिला आहे.स्वच्छ सर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत १५ मार्चपर्यंत सिडकोच कचरा उचलेल. त्यानंतर हस्तांतरणाची प्रक्रि या आयुक्तांच्या मार्फत पार पडल्यानंतर पालिका कचरा उचलण्यास सुरु वात करेल. सिडकोने कचरा उचलण्याचे मान्य केले आहे.- संध्या बावनकुळे,उपायुक्त, पनवेल महापालिकास्वच्छ सर्वेक्षण सुरू असल्याने पालिकेच्या पदाधिकाºयांनी सिडकोला कचरा उचलण्यासाठी विनंती केली आहे. त्यानुसार १५ मार्चपर्यंत सिडको कचरा उचलणार आहे. १५ मार्चनंतर पनवेल महानगरपालिका कचरा उचलणार आहे.- मोहन निनावे,जनसंपर्क अधिकारी, सिडकोमहापालिका कचरा हस्तांतरणाबाबत चालढकल करीत आहे. पालिका प्रशासन केवळ दिखावेगिरी करीत असून, सर्वसामान्य नागरिकांना आम्हाला तोंड द्यावे लागत आहे. कचरा हस्तांतरणाचा ठराव झाला असताना पालिका मुद्दामहून नागरिकांना वेठीस धरण्याचे काम करीत आहे.- परेश ठाकूर,सभागृहनेते, पनवेल महापालिकानागरिकांच्या पालिकेकडून अपेक्षा वाढत आहेत. मात्र, अशाप्रकारे समस्या उद्भवल्यास त्याला पालिकाच जबाबदार आहे. कचरा दोन-दोन दिवस उचलला जात नसेल, तर गंभीर आरोग्याचा प्रश्न उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे. - दीपक शिंदे, नागरिक, खारघरआयुक्तांच्या हलगर्जीपणामुळे पनवेलकरांवर ही वेळ आली. आयुक्त हेतुपुरस्सर कचरा हस्तांतरणात खोडा घालत आहेत. ठराव झाला असताना पालिका कचरा का उचलत नाही.- जगदीश गायकवाड,नगरसेवक, भाजपाआमदारांचे सिडकोला पत्रपनवेल महानगरपालिका व सिडको यांच्यातील आरोग्य सेवा हस्तांतरणातील वादात पनवेलचे नागरिक भरडले जात आहेत. त्यातच पनवेलचे महापौर आणि आयुक्त हे नगरविकास खात्यामार्फत आयोजित केलेल्या अभ्यासदौºयासाठी परदेशात गेल्याने याबाबत पर्यायी व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे पनवेल महापालिका हद्दीतील सिडको विकसित वसाहतीमधील कचरा उचलण्याबाबत पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सिडको प्रशासनास कचरा उचलणे चालू ठेवण्याबाबतचे आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार ठाकूर यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्याकडे शुक्रवारी पत्राद्वारे केली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई