आदिवासी भागात आरोग्य सेवा वार्यावर
By Admin | Updated: May 29, 2014 01:39 IST2014-05-29T01:39:26+5:302014-05-29T01:39:26+5:30
सन २०११ चे वैद्यकीय अधिकार्यांचे स्थगित केलेले आंदोलन १ जून २०१४ पासून राज्यशासनाच्या विरोधात पुन्हा सुरू करणार आहे

आदिवासी भागात आरोग्य सेवा वार्यावर
तलासरी : सन २०११ चे वैद्यकीय अधिकार्यांचे स्थगित केलेले आंदोलन १ जून २०१४ पासून राज्यशासनाच्या विरोधात पुन्हा सुरू करणार आहे. या आंदोलनाचा फटका प्रामुख्याने आदिवासी भागात आदिवासी रूग्णांना बसणार आहे. १ जूनपासून सुरू होणार्या या आंदोलनात तलासरी तालुका प्राथमिक आरोग्य केंद्राचे व ग्रामीण रूग्णालयातील १५ वैद्यकीय अधिकारी सहभागी होणार असल्याने आदिवासी भागातील आदिवासी रूग्ण आरोग्य सेवेपासून वंचित राहणार आहेत. महाराष्टÑातील जवळपास ८० टक्के जनतेला आरोग्य सुविधा पुरविणार्या व ग्रामीण भागामध्ये कार्यरत असणार्या अशा या वैद्यकीय अधिकार्यांकडे काही कारणाने शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने व त्याचे अनेक न्याय्य प्रश्न प्रदिर्घ काळापासुन प्रलंबीत राहिलेले आहेत. या प्रश्नांसंदर्भात शासनाचे नेहमीच उदासिन धोरण राहिलेले आहे. त्यामुळे डॉक्टर शासकीय सेवेकडे आकर्षित होत नाहीत, शासकीय सेवेत तज्ञ डॉक्टरांचा अभाव दिसून येतो. याचा परिणाम आदिवासी तसेच गरीब रूग्णांवर होतो. याबाबत वारंवार आवाज उठवून दखल घेतली जात नसल्याने १ जूनपासुन आंदोलन करण्याचा इशारा वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांची शिखर संघटना मॅग्नो हिने घेतला आहे. (वार्ताहर)