वॉक विथ कमिशनर

By Admin | Updated: September 3, 2016 02:44 IST2016-09-03T02:44:54+5:302016-09-03T02:44:54+5:30

महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक विभागातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम राबविला जात आहे. शनिवार, ३ सप्टेंबर रोजी महापालिका आयुक्त

Walk with Commissioner | वॉक विथ कमिशनर

वॉक विथ कमिशनर

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक विभागातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम राबविला जात आहे. शनिवार, ३ सप्टेंबर रोजी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सकाळी ६.३० वाजता कोपरखैरणे सेक्टर १९ परिसरातील धारण तलावाजवळ ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना तक्र ारी, सूचना, संकल्पना महापालिका आयुक्तांकडे मांडावयाची संधी या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी महापालिका विभाग कार्यालय प्रतिनिधीकडून टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावा आणि टोकन क्र मांकानुसार महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर करण्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

Web Title: Walk with Commissioner