वाळीत प्रकरणी उशिराने जाग
By Admin | Updated: December 12, 2014 02:16 IST2014-12-12T02:16:54+5:302014-12-12T02:16:54+5:30
रोहे तालुक्यातील गावक:यांनी वाळीत टाकलेल्या मोहिनी तळेकर या विधवेच्या आत्महत्त्येबाबत राज्य मानवी हक्क आयोगाने रायगडच्या जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाला चांगलेच फटाकरले.

वाळीत प्रकरणी उशिराने जाग
आविष्कार देसाई ल्ल रोहा
रोहे तालुक्यातील गावक:यांनी वाळीत टाकलेल्या मोहिनी तळेकर या विधवेच्या आत्महत्त्येबाबत राज्य मानवी हक्क आयोगाने रायगडच्या जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाला चांगलेच फटाकरले. आयोगाच्या दट्ट्य़ानंतर दोन्ही विभागप्रमुख आता खडबडून जागे झाले आहेत. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी ते संबंधीत भागाला भेट देणार आहेत.
रोहे तालुक्यातील खाजणी गावात मोहिनी तळेकर (4क्) दोन मुलांसह राहत होत्या. त्यांना गावक:यांनी वाळीत टाकल्याने त्यांनी 18 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. तळेकर यांच्यावर अत्याचार होत असल्याचे समजले तेव्हा आयोगाचे अध्यक्ष न्या. बत्रुरमठ यांनी दोषींविरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते. तसेच वाळीत प्रकरणाला आळा बसवा यासाठी काही शिफारसी केल्या होत्या. तळेकर यांची मुले होळीच्या सणात सहभागी होत नसल्याने त्यांना गावक:यांनी वाळीत टाकले होते. याप्रकरणी रोहे पोलिसांनी 31 जणांविरोधात गुन्हा नोंदविला. तसेच गावातील एका मारहाणीच्या प्रकरणात तळेकर यांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे मोहिनी तळेकर यांना विवस्त्र करून त्यांची गावातून धिंड काढली होती. त्यानंतरही त्यांच्यावर अत्याचार सुरूच होते. सततच्या जाचाला कंटाळून अखेर 18 नोव्हेंबरला तळेकर यांनी आत्महत्या केली. गावक:यांच्या अमानूष अत्याचाराला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप तळेकर यांच्या नातेवाईकांनी केला आहे. जिल्हा प्रशासन अथवा पोलीस प्रशासनाने यामध्ये वेळीच हस्तक्षेप केला असता, तर तळेकर यांचा मृत्यू झाला नसता. याची मानवी आयोगाने दखल घेतली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे आणि जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांना दोन आठवडय़ात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाच्या दट्ट्य़ानंतर आता दोन्ही अधिकारी पुढील आठवडय़ात या ठिकाणी पोचणार आहेत.
मोहिनी तळेकर यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून 31 ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच आरोपींना रोहा पोलिसांनी अटक केली आणि न्यायासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. आरोपींमध्ये महेश लोंढे, मंगेश लोंढे, दशरथ गायकर, साईनाथ तळेकर व कृष्णा भगत यांचा समावेश आहे.
उर्वरित 26 आरोपी पसार झाले आहेत. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे, मात्र खाजणी येथील तळेकर यांच्या आत्महत्येस मालमत्ता आणि पैशांचा व्यवहारही कारणीभूत असल्याचे परिसरातील बोलले जात आहे. त्यामुळे रोहा पोलिसांनी त्या दिशेनेही या आत्महत्येचा तपास करावा अशी मागणी होत आहे.
उशिरा सुचलेले शहाणपण
जिल्ह्यात अनेक वाळीत प्रकरणो
समोर आली आहेत. त्यामुळे पोलिस अधिक्षक, मुख्यकार्यकारी अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, ग्रामसेवक, तलाठी, सर्कल, पोलिस पाटील, सरपंच, आमदार, खासदार, प्रसारमाध्यमे यांनी वाळीत प्रकरणाबाबत जनजागृतीपर कार्यक्रमात सहभागी व्हावे, यासाठी जिल्हाप्रशासनाने कार्यक्रम
आखला आहे.
अहवाल मागितला आहे. अधिकारी पुढच्या आठवडय़ात घटनास्थळी जाणार आहेत. त्यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. महावरकर येणार आहेत. परिस्थीतीचे अवलोकन करून याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सुमंत भांगे यांनी सांगितले.
पोलिसांनी आपले काम केले आहे. सामाजिक बहिष्काराचा विषय खूपच संवेदनशील आहे. संबंधीतावर काय कारवाई करायची याचा सर्वस्वी जिल्हाधिका:यांचा निर्णय आहे. सध्या तपास सुरू आहे, अशी माहिती रायगडचे जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी दिली.