शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
4
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
5
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
6
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
7
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
8
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
9
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
10
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
11
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
12
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
13
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
14
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
15
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
16
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
17
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
18
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
19
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
20
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षांनी अडवली प्रवाशांची वाट, कारवाईकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 01:57 IST

नवी मुंबई शहरातील बहुतांश रेल्वेस्थानकांच्या बाहेरची मोकळी जागा रिक्षाचालकांनी बळकावली आहे. त्याठिकाणी अवैध थांबे तयार झाले असून, त्यामाध्यमातून प्रवाशांची वाट अडवली जात आहे.

 - सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई - शहरातील बहुतांश रेल्वेस्थानकांच्या बाहेरची मोकळी जागा रिक्षाचालकांनी बळकावली आहे. त्याठिकाणी अवैध थांबे तयार झाले असून, त्यामाध्यमातून प्रवाशांची वाट अडवली जात आहे. तर भाडे मिळवण्याच्या प्रयत्नात प्रवाशांसोबतच अरेरावी होत असतानाही, आरटीओसह वाहतूक पोलिसांकडून ठोस कारवाईकडे डोळेझाक होत आहे.नवी मुंबईचा विकास करताना रेल्वेस्थानकांभोवतीच्या जागेचे भविष्याच्या दृष्टिकोनातून नियोजन होणे अपेक्षित असतानाही तसे झालेले नाही. यामुळे शहरातील बहुतांश रेल्वेस्थानकांच्या बाहेर वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. त्यात रिक्षांनी अधिकच भर टाकलेली आहे. त्यामध्ये ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, वाशी, नेरुळ तसेच सीबीडी या स्थानकांभोवतीच्या परिसराचा समावेश आहे. रेल्वे प्रवाशांना चालण्यासाठी असलेल्या जागेत देखील रिक्षांची घुसखोरी झालेली आहे. यामुळे रेल्वेस्थानकांच्या प्रवेशद्वारावरच प्रवाशांची अडवणूक होत आहे. मागील काही वर्षात शहरातील रिक्षांच्या संख्येत दुपटीने वाढ झालेली आहे. त्यामुळे अधिकृतरीत्या दिलेल्या थांब्यावर जागा अपुरी पडत असल्याने त्यांनी रस्त्यांवरच थांबे तयार केले आहेत.मोकळी जागा मिळेल त्याठिकाणी रिक्षा थांबवून स्थानकातून प्रवासी बाहेर पडताच त्यांना स्वत:च्याच रिक्षात बसवण्याचा प्रयत्न होत असतो. या प्रकारात रिक्षाचालकांचे आपसात अथवा प्रवाशांसोबत वाद होण्याचेही प्रकार घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये रिक्षाचालकांची दहशत निर्माण झाली आहे. मुजोरी करणाऱ्या रिक्षाचालकांमध्ये बहुतांश बोगस रिक्षांवरील चालकांचाही समावेश आहे. त्यांच्याकडून मर्जीच्या मार्गावरचेच भाडे स्वीकारणे, जवळचे भाडे नाकारणे, मीटरप्रमाणे येण्यास नाकारणे असे प्रकार सुरूच असतात. मात्र त्यांच्याविरोधात तक्रार करून देखील आरटीओ तसेच वाहतूक पोलिसांकडून कारवाईला टाळाटाळ केली जात आहे. परिणामी प्रशासनच आपल्या खिशात असल्याची उर्मट भाषा रिक्षाचालकांकडून प्रवाशांसोबत केली जात आहे.नेरुळ रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूस हेच चित्र पाहायला मिळत आहे. यासंदर्भात अनेकांनी सातत्याने तक्रारी करून देखील तिथल्या रिक्षाचालकांच्या मुजोरीला लगाम घालण्यास आरटीओ तसेच वाहतूक पोलीस अपयशी ठरले आहेत. यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होत असून वाहतूककोंडीची देखील समस्या भेडसावत आहे. तर वाशी रेल्वेस्थानकाबाहेर रिक्षा थांब्यासाठी पुरेसी जागा दिलेली असतानाही त्याठिकाणी रस्त्यावरच रिक्षा उभ्या करून प्रवासी मिळवण्याच्या प्रयत्नात रहदारीला अडथळा निर्माण केला जात आहे.घणसोली रेल्वेस्थानकाबाहेर देखील थांबा असतानाही, रस्त्यावरच रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला जात आहे. यामुळे त्याठिकाणी वाहतूककोंडी उद्भवत असून दोन गटांत हाणामारीचे देखील प्रकार घडले आहेत. ऐरोली रेल्वेस्थानकाच्या पूर्व पश्चिम दोन्ही भागात हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.तुर्भे रेल्वेस्थानकाच्या ठाणे-बेलापूर मार्गाकडील बाजूला पदपथांवर रिक्षाचे थांबे तयार करण्यात आले आहेत. तसेच बेशिस्तपणे रस्त्यावर रिक्षा चालवल्या जात आहेत. यामुळे वाहतूककोंडी होत असून छोट्या-मोठ्या अपघाताच्या देखील घटना घडत आहेत. यानंतरही तिथल्या परिस्थितीकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.रिक्षाचालकांच्या मुजोरीला लगाम घालून रेल्वेस्थानकांच्या बाहेरचे रस्ते रहदारीला मोकळे करणे गरजेचे आहे. वर्षानुवर्षे त्याकडे दुर्लक्ष होत गेल्यास त्याठिकाणची जागा रिक्षा थांब्यासाठी बळकावली जावू शकते. त्यामुळे भविष्यात असे थांबे हटवायचे झाल्यास संघटनांच्या विरोधाला सामोरे जायला लागू शकते.नेरुळ रेल्वेस्थानकाबाहेर रिक्षाचालकांकडून प्रवाशांची वाट अडवली जात आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच रिक्षा आडव्या लावून प्रवासी मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. असाच प्रकार शहरातील सर्वच रेल्वेस्थानकांच्या बाहेर पाहायला मिळत आहे. यानंतरही आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडे कारवाईकडे होणारे दुर्लक्ष संशयास्पद आहे.- हरेश भोईर, नागरिक

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई