व्होटिंग सेल्फी-मेसेजेसची धूम

By Admin | Updated: October 16, 2014 22:52 IST2014-10-16T22:52:54+5:302014-10-16T22:52:54+5:30

शाई लावलेल्या बोटासह आपले फोटो व्हॉट्सअॅप, फेसबुकवर अपलोड करून त्याच माध्यमातून इतरांना मतदानासाठी आवाहन केले

Voting Selfie-Messages Dhoom | व्होटिंग सेल्फी-मेसेजेसची धूम

व्होटिंग सेल्फी-मेसेजेसची धूम

ठाणो - बुधवारी अनेक नोकरदार तरुणांनी सकाळी लवकर मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच शाई लावलेल्या बोटासह आपले फोटो व्हॉट्सअॅप, फेसबुकवर अपलोड करून त्याच माध्यमातून इतरांना मतदानासाठी आवाहन केले. त्यामुळे बुधवारी सोशल नेटवर्किग साइटवर मतदान जागृतीचे मेसेजेस, इमेजेस आणि सेल्फींचा खच पाहायला मिळाला.
मतदानाचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने या वेळी निवडणूक आयोगासह विविध संस्था, महाविद्यालयांनी विविध पद्धतीने जागृती केली होती. त्याला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एक दिवस आधीपासूनच मतदान करण्याबाबत तरुणांमध्ये कट्टा, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर चर्चा रंगल्या होत्या आणि बुधवारी सकाळी मतदान सुरू झाल्यावर पहिल्या टप्प्यातही मतदान करणा:यांमध्ये तरुणांची संख्या जास्त होती. 
मतदान केल्यानंतरच अनेकांनी ऑफिस गाठून सजगता दाखविली. विशेष म्हणजे व्होटिंग सेल्फी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर अपडेट करून मी मतदान केले, तुम्ही केले का, असे एकमेकांना प्रश्न विचारले जात होते. व्हॉट्सअॅपवर मतदानाला साजेसे असे ग्रुप, नेम, डीपी आणि स्टेटसही पाहायला मिळाले. 
..तर उठा-उठा निवडणूक आली, मतदानाची वेळ झाली.., मतदान लोकशाहीचे वरदान.., एक मतही बदल घडवू शकते.., अगर उंगली मे दाग लगने से अच्छी सरकार बनती है, तो दाग अच्छा है.., हा डाग तुम्हाला कलंकित नाही तर मानांकित करणार आहे.. अशा मेसेजेससह कुणी मतदान केले, कधी करणार आणि कोणत्या जिल्ह्यात, मतदारसंघात किती मतदान झाले, याच्या चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. (प्रतिनिधी)

 

Web Title: Voting Selfie-Messages Dhoom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.