मतदानाच्या हक्कासाठी दीड कोटी गेले वाया

By Admin | Updated: February 25, 2017 03:15 IST2017-02-25T03:15:22+5:302017-02-25T03:15:22+5:30

रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी १० लाख ३८ हजार २७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला; परंतु उर्वरित चार लाख २४ हजार ६२५ मतदारांनी मतदानाला चक्क दांडी मारली.

Voting rights have gone up to 1.5 crores | मतदानाच्या हक्कासाठी दीड कोटी गेले वाया

मतदानाच्या हक्कासाठी दीड कोटी गेले वाया

आविष्कार देसाई ,  अलिबाग
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी १० लाख ३८ हजार २७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला; परंतु उर्वरित चार लाख २४ हजार ६२५ मतदारांनी मतदानाला चक्क दांडी मारली. त्यामुळे त्यांच्यासाठी मतदान प्रक्रियेवर होणारा प्रत्येकी ४० रुपयांप्रमाणे एक कोटी ६९ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च वाया गेला आहे. जिल्हा प्रशासनाने प्रयत्नांची पराकाष्ठा करून प्रत्येकाने मतदान करावे, यासाठी जिल्हाभर विविध कार्यक्रम राबविले. मात्र, मतदारांनी त्यांच्या आवाहनला न जुमानल्याने प्रशासानाला आता अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी तब्बल १४ लाख ६२ हजार ८९५ मतदार आहेत. त्यामध्ये सात लाख ३७ हजार १०४ महिला मतदार, तर सात लाख २५ हजार ७९० पुरुष मतदारांचा समावेश आहे. सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी सरकार, निवडणूक आयोग, जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत असते. मतदारांना जागृत करण्यासाठी विविध कार्यशाळा, पथनाट्य, मोठमोठे होर्डिंग्ज अशा विविध स्तरांतून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जातात. यासाठी प्रत्येक मतदारांसाठी ४० रुपयांचा खर्च गृहित धरण्यात आला होता. त्याप्रमाणे पाच कोटी ८५ लाख १५ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित होता.
२१ फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या ५९ आणि पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी मतदान पार पडले. त्यामध्ये १० लाख ८० हजार २७० मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला. चार लाख २४ हजार ६२५ मतदारांनी चक्क मतदानाला दांडी मारली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी एक कोटी ६९ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च वाया गेल्यातच जमा आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेत सुमारे एक लाख मतदारांना विविध कारणांनी मतदान करता न आल्याने त्यांनी प्रचंड हल्लाबोल केला होता. रायगडातील मतदारांनी मतदानाकडे का पाठ फिरवली याची कारणे प्रशासनाला अभ्यासावी लागणार आहेत. अन्यथा, कोट्यवधी रुपयांच्या निधीचा असाच अपव्यय सुरू राहील.


१कार्लेखिंड : रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारांना आपले मत न देता नोटाचा मोठ्या प्रमाणावर वापर के ल्याचे दिसतआहे. रायगड जिल्हा परिषद निवडणूक २०१७ चा निकाल जाहीर झाला आणि त्यामध्ये शेकाप प्रथम क्रमांक तर शिवसेना दुसऱ्या स्थानावर विजयी झाली.
२अलिबाग मतदार संघातून जिल्हा परिषदेसाठी शेकापला आठ जागा तर शिवसेनेला तीन जागा, काँग्रेस पक्षाला दोन जागा आणि भाजपाला एक जागा मिळाली. लागलेल्या कौलप्रमाणे शेकाप, शिवसेना या दोन पक्षांच्या जागा वाढल्या; परंतु काँग्रेस पक्षाला कच खावी लागली. या निवडणुकांमध्ये अलिबाग तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी १,५४,०८१ मतदान झाले तर पंचायत समितीसाठी १,३५,८४९ इतके मतदान झाले आहे.
३असे असले तरी मतदारांनी निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांना नापसंती देत नोटाचा आकडा वाढला आहे. पंचायत समितीसाठी ३२१९ आणि जिल्हा परिषदेसाठी ३४२५ इतक्या मतदारांनी आपल्या मतदानातून उमेदवारांवर नाराजी व्यक्त के ली आहे.

Web Title: Voting rights have gone up to 1.5 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.