शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

जेएनपीएच्या २ कामगार ट्रस्टी पदांसाठी मतदान, ६५२ कामगार आजमावतायंत भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 9:45 PM

विविध कामगार संघटना आणि जेएनपीएच्या प्रशासनाच्या रेट्यामुळे दुसऱ्यांदा लांबणीवर पडलेली कामगार ट्र्स्टी पदांची निवडणूक जाहीर झाली आहे

मधुकर ठाकूर

उरण :  चारही संघटनांच्या जोरदार प्रचारानंतर मंगळवारी (१५) जेएनपीएच्या दोन कामगार ट्र्स्टी पदासाठी गुप्त मतदानाने निवडणूक होणार आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ऐवजी ॲथोरिटी ॲक्ट स्थापन झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. पहिल्यांदाच तीन वर्षांच्या कालावधीसाठी असलेल्या निवडणुकीत बंदरातील मान्यता प्राप्त चार कामगार संघटना सहभागी झाल्या असून ६५२ कामगार ट्रस्टीपदाच्या निवडणुकीत इच्छुकांचे भविष्य ठरविणार आहेत.    जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ऐवजी प्राधिकरण 

जानेवारी २०२२ पासून अस्तित्वात आल्यानंतर बंदराचे कामकाज या ॲथोरिटी ॲक्टनुसारच सुरू झाले आहे.प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे.दरम्यान तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या दोन कामगार ट्र्स्टींची मुदत वर्षांपूर्वीच तर आणखी मार्च २०२२ पर्यंत देण्यात आलेली एक वर्षाची मुदतवाढही संपुष्टात आली होती. त्यामुळे एप्रिलमध्ये दोन कामगार ट्र्स्टी पदासाठी निवडणूक घेणे अपेक्षित होते.दरम्यान केंद्रीय श्रम आयुक्तांनी दोन कामगार नियुक्त ट्र्स्टी पदासाठी येत्या २ ऑगस्ट रोजी गुप्त मतदानाने निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते.मात्र निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याआधीच निवडणूकीची तारीख जाहीर करण्यात आल्याने जाहीर करण्यात आलेली निवडणूक रद्द करण्यात नामुष्कीची वेळ जेएनपीए प्रशासनावर आली होती. पुन्हा  निवडून लांबणीवर पडल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरला होता. त्यानंतर विविध कामगार संघटना आणि जेएनपीएच्या प्रशासनाच्या रेट्यामुळे दुसऱ्यांदा लांबणीवर पडलेली कामगार ट्र्स्टी पदांची निवडणूक जाहीर झाली आहे.     कामगार ट्र्स्टी पदासाठी १५ नोव्हेंबरला रोजी निवडणूक घेण्याची घोषणा केंद्रीय श्रम आयुक्तांनी जाहीर केल्यानंतर जेएनपीटी कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष माजी ट्र्स्टी दिनेश पाटील, न्हावा-शेवा बंदर कामगार (अंतर्गत) संघटनेचे सरचिटणीस व माजी ट्र्स्टी भुषण पाटील, जेएनपीटी वर्कर्स युनियनचे सरचिटणीस व माजी ट्र्स्टी रविंद्र पाटील, न्हावा-शेवा पोर्ट ॲण्ड जनरल वर्कर्स युनियनचे अध्यक्ष एम.के.पाटील  या मान्यता प्राप्त कामगार संघटना आपल्या कामगार सहकाऱ्यांच्या मदतीने निवडणूकीच्या मैदानात उतरल्या आहेत. दिवाळी पासुनच या चारही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचाराचा धुरळा उडविला आहे.प्रथम व दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविणाऱ्या कामगार संघटनेचे दोन कामगार ट्र्स्टींना तीन वर्षांसाठी काम करण्याची संधी मिळणार आहे.त्यामुळे कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचारात सर्वच बाबतीत झोकून देऊन प्रचाराचा धुरळा उडवला होता. मात्र, जेएनपीएच्या सुमारे ५०० कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर फक्त उरलेले सुजाण ६५३ कामगार कोणत्या दोन कामगार संघटनेला मतदान करतात यावरच दोन कामगार ट्र्स्टींच्या विजयाचे भविष्य अवलंबून आहे.निवडणुकीनंतर त्याच दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

मागील दोन निवडणुकीत संघटना विहित मिळालेली मते 

१ -  जेएनपीटी कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष माजी ट्र्स्टी दिनेश पाटील ( २०१७- ६०२ मते ), (२०२०- ५३४ मते ) २-न्हावा-शेवा बंदर कामगार (अंतर्गत) संघटनेचे सरचिटणीस व माजी ट्र्स्टी भुषण पाटील ( २०१७- २४४ मते )२०२०- २८२ मते )  

 ३--जेएनपीटी वर्कर्स युनियनचे सरचिटणीस व माजी ट्र्स्टी रविंद्र पाटील -२०१७- ३६० मते ) ( २०२०- २४७ मते ) 

४---न्हावा-शेवा पोर्ट ॲण्ड जनरल वर्कर्स युनियनचे अध्यक्ष एम.के.पाटील (२०१७- ११० मते ), ( २०२०- १६० मते )

टॅग्स :JNPTजेएनपीटीElectionनिवडणूकNavi Mumbaiनवी मुंबई