केडीएमसी नगरसेवकांचे दौ:यांवर दौरे
By Admin | Updated: November 22, 2014 22:38 IST2014-11-22T22:38:42+5:302014-11-22T22:38:42+5:30
संशोधनाचा विषय असताना आता पुन्हा एकदा अभ्यास दौ:याच्या निमित्ताने नगरसेवक शनिवारी केरळला मार्गस्थ झाले आहेत.

केडीएमसी नगरसेवकांचे दौ:यांवर दौरे
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगरसेवकांनी गेल्या चार वर्षात केलेल्या विविध अभ्यास दौ:यांमधून काय साधले, हा संशोधनाचा विषय असताना आता पुन्हा एकदा अभ्यास दौ:याच्या निमित्ताने नगरसेवक शनिवारी केरळला मार्गस्थ झाले आहेत. अर्धवट राहिलेले विकास प्रकल्प, बीओटी प्रकल्पांचा उडालेला बोजवारा आणि स्वच्छतेचे वाजलेले तीनतेरा अशी एकंदरीत परिस्थिती असताना ‘फलित शून्य’ ठरणा:या या दौ:यांवर पुन्हा एकदा लाखोंची उधळपट्टी केली जाणार आहे.
केडीएमसीच्या 2क्1क् च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांनी गेल्या चार वर्षात अभ्यास दौरे आणि प्रकल्प पाहण्याच्या निमित्ताने गोवा, राजस्थान, गुजरात, हैदराबाद, बंगळुरू या विविध राज्यांना भेटी दिल्या आहेत. या अभ्यास दौ:यांवर सुमारे 63 लाखांचा खर्च झाला आहे. परंतु, नगरसेवकांनी शहरासाठी कोणत्या योजना राबविल्या, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अभ्यास दौ:याच्या निमित्ताने एखाद्या प्रकल्पाला भेट दिल्यानंतर अहवाल महासभेत सादर करणो आवश्यक असत़े परंतु, याबाबत प्रशासनाबरोबरच संबंधित नगरसेवकही उदासीन आहेत.
गेल्या चार वर्षातील दौ:यांचे ‘फ लित शून्य’ अशी टीका होत असताना आता पुन्हा अभ्यास दौ:याच्या निमित्ताने शनिवारी केडीएमसीतील 1क्7 नगरसेवकांपैकी 55 नगरसेवक केरळला मार्गस्थ झाले. 27 नोव्हेंबर्पयत हा दौरा असून यात केरळमधील विविध विकास प्रकल्प आणि त्रिवेंद्रम महापालिकेला भेट दिली जाणार आहे. या दौ:यावर अंदाजे 32 ते 33 लाखांचा खर्च होणार असल्याची सूत्रंची माहिती आहे.
आतार्पयत झालेला खर्च
दिनांक ठिकाण खर्च
17 नोव्हेंबर 2क्11 गोवा 1क् लाख 5क् हजार 299 रुपये
16 ऑगस्ट 2क्12 हैदराबाद 8 लाख रुपये
12 मार्च 2क्13 गुजरात, राजस्थान 18 लाख 9क् हजार रुपये
23 नोव्हेंबर 2क्13 बंगळुरू 25 लाख 31 हजार 5क्क् रुपये