भिवंडीत दूषित पाण्याचा बळी
By Admin | Updated: February 20, 2015 01:30 IST2015-02-20T01:30:26+5:302015-02-20T01:30:26+5:30
शहरातील पद्मानगर भागात ८-१० दिवसांपासून झालेल्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे परिसरात गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. त्यामुळे उपचार सुरू असताना एक रुग्ण दगावला आहे.

भिवंडीत दूषित पाण्याचा बळी
गॅस्ट्रोची साथ : आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
भिवंडी : शहरातील पद्मानगर भागात ८-१० दिवसांपासून झालेल्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे परिसरात गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. त्यामुळे उपचार सुरू असताना एक रुग्ण दगावला आहे. परशुराम सतय्या कोंका (३६) असे त्यांचे असून त्यांना उलटी, जुलाब होत असल्याने इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले होते.
पाणीपुरवठा व आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे त्याचा बळी गेल्याची भावना नागरिकांमध्ये पसरली आहे. गेल्या आठवड्यात पद्मानगर भागात नळातून दूषित पाणी येत होते. कारवाई न झाल्याने आठ ते दहा दिवस रहिवाशांना गॅस्ट्रोसारख्या आजारांचा सामना करावा लागला. शेकडो आजारी रहिवाशांनी स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार घेतले. इतरांनी खासगी रुग्णालयात व दवाखान्यांत उपचार घेतले. परंतु, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने या घटनेची दखल घेतली नाही. त्यांनी पिण्याचे पाणी शुद्ध करणाऱ्या औषधांच्या बाटल्या परिसरात वाटल्या असत्या तर आजारांवर नियंत्रण आले असते. तसेच उपचारासाठी कॅम्प आयोजित केल्यासही परिस्थिती नियंत्रणात ठेवता आली असती. (प्रतिनिधी)