नो पार्कीगमधील वाहने दोरखंडात

By Admin | Updated: September 18, 2014 23:35 IST2014-09-18T23:35:16+5:302014-09-18T23:35:16+5:30

अनधिकृतपणो पार्क केलेल्या मोटार सायकली बोईसर पोलीसांनी तारेच्या जाड दोरखंडानी जखडून ठेवल्या असून त्या मोटार सायकली मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Vehicles in no parking | नो पार्कीगमधील वाहने दोरखंडात

नो पार्कीगमधील वाहने दोरखंडात

बोईसर : बोईसर रेल्वे स्थानकाच्या आवारातील नो पार्कीग झोन मध्ये अनधिकृतपणो पार्क केलेल्या मोटार सायकली बोईसर पोलीसांनी तारेच्या जाड दोरखंडानी जखडून ठेवल्या असून त्या मोटार सायकली मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
बोईसर रेल्वे स्थानकाच्या आवारात असलेल्या रिक्षास्टँड जवळ असलेल्या स्थानकाच्या इमारती बाहेर एस.बी.आय च्या एटीएम जवळ नो पार्कीगचा फलक लावण्यात असून असंख्या मोटार सायकल चालक फलकावरील सूचना धाब्यावर बसवून अनधिकतपणो मोटार सायकली पार्क करून तेथे अडथळा निर्माण करीत असल्याने बोईसर पोलीसांनी आजची कारवाई केली तर नो पार्कीग समोरील जागा मोकळी झाल्यास तेथे रिक्षा उभ्या राहू शकतात. 
त्यामुळे रस्त्यावर उभ्या राहणा:या रिक्षांना पुरेसी जागा स्थानकाच्या आवारात उपलब्ध होऊ शकणार असल्याचे बोईसर पोलीसांकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)

 

Web Title: Vehicles in no parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.