शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

भाजीपाला महागला, पावसामुळे आवक घटली; मिरची, फरसबीने ओलांडले शतक

By नामदेव मोरे | Updated: June 27, 2023 08:52 IST

Vegetables Became Expensive: राज्यभर सुरू झालेल्या पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये आवक घटली आहे, तसेच पावसामुळे भाजीपाला खराब झाल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत.

- नामदेव मोरेनवी मुंबई : राज्यभर सुरू झालेल्या पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये आवक घटली आहे, तसेच पावसामुळे भाजीपाला खराब झाल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. मिरची, वाटाणा, फरसबी, घेवडा यांनी शंभरी ओलांडली आहे. टोमॅटोची आवकही राज्यात सर्वत्र कमी असून भाव वाढले आहेत. होलसेल मार्केटमध्ये टोमॅटो २५ ते ५० रुपये व किरकोळ मार्केटमध्ये ७० ते १०० रुपये किलो दराने विकले जात आहेत. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रत्येक सोमवारी ६०० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पोमधून भाजीपाल्याची आवक  होत असते. मात्र, या सोमवारी पावसामुळे फक्त ५६७ वाहनांची नोंद झाली. पावसामुळे भाजीपाला खराब होण्याचे प्रमाणही वाढले आहे.  खराब झालेला माल फेकून द्यावा लागतो. किरकोळ विक्रेत्यांनी खरेदी केलेल्या मालामध्येही १० ते २० टक्के खराब माल असल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. 

मार्केटमध्ये २६५ टन टोमॅटोची आवक झाली आहे. किरकोळ विक्रेत्यांना खराब माल काढून टाकावा  लागत असून उरलेल्या मालाची विक्री करावी लागत असल्याने टोमॅटोचे दर किरकोळ मार्केटमध्ये ७० ते १०० रुपये झाले आहेत.

हिरव्या मिरचीचा तुटवडाहिरव्या मिरचीचाही तुटवडा निर्माण झाला आहे. होलसेल मार्केटमध्ये मिरची ४० ते ५५ रुपये व किरकोळ मार्केटमध्ये १०० ते १२० रुपयांवर पोहोचली आहे. वाटाणा १०० ते १२० रुपये, घेवडा १०० ते १२०, फरसबी १०० ते १२० रुपये किलो दराने किरकोळ मार्केटमध्ये विक्री होत आहे.

प्रमुख मार्केटमधील टोमॅटोचे प्रतिकिलो दरमार्केट    प्रतिकिलो दर पुणे    ३६ ते ५५औरंगाबाद    ५५ ते ६५श्रीरामपूर    २० ते ७०नागपूर    ४० ते ८०

 

टॅग्स :vegetableभाज्याInflationमहागाईNavi Mumbaiनवी मुंबई