वाराणसी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड

By Admin | Updated: October 28, 2014 01:58 IST2014-10-28T01:58:20+5:302014-10-28T01:58:20+5:30

मालगाडीचे इंजीन आसनगाव-आटगाव स्थानकांदरम्यान बिघडून दोन दिवस उलटतात न उलटतात तोच सोमवारी सकाळी याच मार्गावर वासिंद स्थानकादरम्यान वाराणसी एक्स्प्रेसचे इंजीन बिघडले.

Varanasi Express's Engine Failure | वाराणसी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड

वाराणसी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड

डोंबिवली : मालगाडीचे इंजीन आसनगाव-आटगाव स्थानकांदरम्यान बिघडून दोन दिवस उलटतात न उलटतात तोच सोमवारी सकाळी याच मार्गावर वासिंद स्थानकादरम्यान वाराणसी एक्स्प्रेसचे इंजीन बिघडले. त्यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे विशेषत: कल्याण-कसारा मार्गाचे तीनतेरा वाजले.
दिवाळीच्या आठवडाभराच्या सुटीनंतर कामावर जाणा:या हजारो चाकरमान्यांना या खोळंब्यामुळे लेटमार्कला सामोरे जावे लागले. रेल्वेच्या या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. डाऊन मार्गावर सकाळी साडेसहा-पावणोसातच्या सुमारास ही घटना घडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्याचा परिणाम अप मार्गावरील लोकल वाहतुकीवर झाला. सकाळच्या वेळेत कसारा स्थानक व आसनगावला येणा:या उपनगरी गाडय़ांचा खोळंबा झाल्याने त्याचा फटका अप मार्गावरील वाहतुकीला बसला. त्यामुळे वासिंद ते कसारा डाऊनसह अप दिशेच्या बहुतांशी सर्वच स्थानकांमध्ये तुडुंब गर्दी उसळली होती. उद्घोषणा नसल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. 
 
कल्याणहून आणले इंजीन 
सकाळी साडेआठच्या सुमारास कल्याणहून आलेल्या अन्य एका इंजिनाच्या साहाय्याने खोळंबलेली गाडी हळूहळू कसा:यार्पयत आणण्यात आली. त्यानंतर पावणोनऊपासून वाहतूक  सुरळीत झाली, असे मध्य रेल्वेचे म्हणणो असले, तरी सकाळच्या सत्रतील लोकलचे वेळापत्रक सपशेल कोलमडले होते. 

 

Web Title: Varanasi Express's Engine Failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.