गाडी पर्ा्िक गवरून उरणमध्ये हाणामारी
By Admin | Updated: October 29, 2014 01:07 IST2014-10-29T01:07:05+5:302014-10-29T01:07:05+5:30
उरण तालुक्यातील न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुंडे गावात गाडी उभी करण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याचा प्रकार घडला.

गाडी पर्ा्िक गवरून उरणमध्ये हाणामारी
चिरनेर : उरण तालुक्यातील न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुंडे गावात गाडी उभी करण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याचा प्रकार घडला. यात दोन्ही बाजूंच्या नागरिकांनी एकमेकांना मारहाण करण्यासाठी लाठय़ाकाठय़ा आणि चॉपरचा वापर केला. या प्रकरणी न्हावाशेवा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांच्या 12 जणांविरोधात तक्रार दाखल केली असून, यातील 9 जणांना अटक करण्यात आले आहे.
पहिल्या फिर्यादीत नीलेश म्हात्रे याने रवींद्र म्हात्रे, संदीप म्हात्रे, नितीन म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे, लक्ष्मीकांत म्हात्रे आणि अशोक ठाकूर यांनी लाठय़ाकाठय़ा, चॉपर आदी हत्यारांनी आपल्याला मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आह़े तर दुस:या तक्रारीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आपल्या फिर्यादीत प्रीतम म्हात्रे, नवनीत म्हात्रे, नीलेश म्हात्रे, धीरज म्हात्रे आणि प्रशांत भोईर यांनी आपल्याला लाठय़ाकाठय़ा, चॉपर आदी हत्यारांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गटांनी आपल्या सोन्याच्या चेनी या दंगलीच्यावेळी गायब झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या सर्वाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, फरारी तिघा आरोपींचा पोलीस कसून शोध घेत असल्याची माहिती न्हावाशेवा पोलीस ठाण्याकडून मिळाली. (वार्ताहर)