-वैभव गायकरपनवेल - पनवेल मधील वैष्णवी गणेश कडू हि कमर्शियल पायलट बनली आहे.अमरिकास्थित फ्लोरिडा येथील मायामी एव्हिएशन संस्थेत वैष्णवीने कमर्शियल पायलट ची ट्रेनिंग पूर्ण केली आहे.या यशाबद्दल वैष्णवीसह कडू कुटुंबियांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
वैष्णवीला लहान पणापासूनच वैमानिक होण्याचे स्वप्न होते.याकरिता बारावी (विज्ञान) शाखेच्या शिक्षणाची तीला आवश्यकता होती.ते पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेत वैमानिक प्रशिक्षण संस्थेत तिने प्रवेश घेतला.यावेळी सर्व तांत्रिक शिक्षण घेतल्यानंतर 250 तास विमान उडविण्याचे प्रशिक्षण वैष्णवीने पूर्ण केले.त्यानंतर तिला प्रायव्हेट पायलट लायसन्स ऑक्टोबर महिन्यात बहाल करण्यात आले.यापुढील 1500 तास वैमानिक प्रशिक्षण घेतल्यानंतर वैष्णवी डोमेस्टिक वैमानिक म्हणून कार्यरत राहील.त्यापुढील टप्प्यात आंतराष्ट्रीय वैमानिक होण्यास अशाच स्वरूपाच्या काही तांत्रिक अटी पूर्ण करून ती आंतराष्ट्रीय वैमानिक म्हणून उदयास येईल.
सध्याच्या घडीला मुलाबरोबर मुली प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत.वैष्णवीने देखील या यशातून अनेक मुलींना प्रेरित केले आहे.नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ हे पनवेल तालुक्यात आहे.विमानतळाच्या माध्यमातून हे शहर जगाला जोडले जाणार आहे.त्यामुळे वैष्णवीच्या प्रेरणेने पनवेल मधील असंख्य मुली पायलट म्हणून घडतील अशी खात्री वौष्णवीचे वडील गणेश कडू यांनी व्यक्त केली आहे.वैष्णवीच्या यशाबद्दल पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर ,पालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी अभिनंदन केले आहे.सोशल मीडियावर देखील वैष्णवीचे मोठे कौतुक होत आहे.
आपली मुलगी वैमानिक व्हावी हे स्वप्नच माझ्यासाठी खूप आल्ह्लालदायक होते.हे सत्यात उतरले आणि आम्ही बसलेल्या विमान स्वतः वैष्णवीने उडविणे हे आम्हा पालकांसाठी हे खरोखरच अविस्मरणीय होते.- गणेश कडू (वैष्णवीचे वडील )
Web Summary : Vaishnavi Kadu from Panvel becomes a commercial pilot after training in Florida. Completing 250 flight hours, she earned her private pilot license. Her success inspires many, especially with Navi Mumbai's airport connecting the city globally. Family and community celebrate her achievement.
Web Summary : पनवेल की वैष्णवी कडू ने फ्लोरिडा में प्रशिक्षण के बाद कमर्शियल पायलट बनीं। 250 घंटे की उड़ान पूरी कर प्राइवेट पायलट लाइसेंस प्राप्त किया। नवी मुंबई हवाई अड्डे के साथ उनकी सफलता कई लोगों को प्रेरित करती है। परिवार और समुदाय ने उनकी उपलब्धि का जश्न मनाया।