शहरात 43 जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 12:38 AM2021-03-02T00:38:39+5:302021-03-02T00:38:48+5:30

महापालिकेच्या दोन रुग्णालयांत तिसऱ्या टप्प्याचे लसीकरण सुरू

Vaccination of 43 people in the city | शहरात 43 जणांचे लसीकरण

शहरात 43 जणांचे लसीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबईत महापालिकेच्या दोन रुग्णालयांत कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सोमवारपासून सुरू करण्यात आला आहे. तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षापेक्षा अधिक वयोगटातील ज्येष्ठ नागरिक तसेच सहव्याधी (को-मॉर्बेडिटी) असणारे ४५ ते ५९ वर्षे वयाच्या नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार पहिल्या दिवशी ४९  जणांनी लस घेतली. पनवेल महापालिका क्षेत्रात ९० जणांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये ७४ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता, तर उर्वरित १६ जणांना दुसरा डोस देण्यात आला.      

      लसीकरणावेळी पहिल्या टप्प्यात निर्माण झालेला तांत्रिक गोंधळ सोमवारीदेखील उद्भवल्याचे पाहावयास मिळाले. 
     महापालिका क्षेत्रामध्ये पहिल्या टप्प्यात डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी तर दुसऱ्या टप्प्यात पोलीस आणि शासकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जात आहे.  त्यासाठी  शहरातून सुमारे १९ हजार ८५ कोविड योद्ध्यांची नोंद करण्यात आली होती. सोमवारपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. महापालिकेच्या वाशी व नेरूळ येथील रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी ४९ ज्येष्ठ नागरिकांना  लस देण्यात आली.  तिसऱ्या टप्प्यात शासकीय रुग्णालयात मोफत आणि खासगी  रुग्णालयांत अडीचशे रुपये शुल्क आकारून लस दिली जाणार आहे. नवी मुंबईत सध्या शासकीय स्तर असलेल्या महापालिकेच्या नेरूळ आणि वाशी येथील रुग्णालयात  लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये नोंदणीकृत रुग्णालये, केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेमध्ये नोंदणीकृत रुग्णालये तसेच राज्य शासनाच्या आरोग्य विमा योजनेमध्ये नोंदणीकृत असलेल्या नवी मुंबईतील १२ खासगी रुग्णालयांमध्ये लवकरच लसीकरणाला सुरुवात केली जाणार असल्याचे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे. 
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार १ मार्चपासून राज्याच्या अनेक जिल्ह्यांत तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यासंदर्भात पूर्वकल्पना असल्याने महापालिका तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरणासाठी सज्ज होती. परंतु लसीकरणाच्या आदल्या रात्रीपर्यंत महापालिकेला संबंधित विभागाकडून लसीकरणाबाबत स्पष्ट निर्देश मिळाले नव्हते. शासकीय स्तर असलेल्या महापालिका रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात करण्याच्या मोघम सूचना प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार सोमवारी दुपारपासून  नेरूळ आणि वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयांत तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे लसीकरणासाठी संबंधित पोर्टलवर लाभार्थ्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया वेळकाढूपणाची असल्याने प्रत्यक्ष लसीकरण दुपारी १ वाजल्यानंतर सुरू झाले. शिवाय  नागरिकांनाही याबाबत पुरेशी माहिती नसल्याने लसीकरणाच्या पहिल्या दिवशी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले. 

सहव्याधी असणाऱ्यांना वैद्यकीय 
प्रमाणपत्र आवश्यक 

nलसीकरणासाठी ६0 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड, कार्यालयीन किंवा निवडणूक ओळख पत्र आदी वनागरिकांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, कार्यालयीन, निवडणूक ओळखपत्र आदीपैकी एक सक्षम पुरावा सादर करणे आवश्यक आहे. 
nसोमवारी तिसऱ्या टप्प्यात डोस घेतल्यानंतर २८ ते ४२ दिवसांच्या अंतराने दुसरा डोस घेणे बंधनकारक आहे. 
कारण त्यानंतर पोर्टलमार्फत दुसरा डोस घेता येणार नाही, 
असे नवी मुंबई महापालिकेकडून कळविण्यात आले 
आहे. 
 

Web Title: Vaccination of 43 people in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.