सुट्टीत गावी गेलेल्यांचे निघाले दिवाळे

By Admin | Updated: November 9, 2014 00:33 IST2014-11-09T00:33:47+5:302014-11-09T00:33:47+5:30

दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनानिमत्त फिरायला अथवा गावी गेलेल्या नवी मुंबईवासीयांचे चांगलेच दिवाळे निघाले आहे.

Vacation busted bust | सुट्टीत गावी गेलेल्यांचे निघाले दिवाळे

सुट्टीत गावी गेलेल्यांचे निघाले दिवाळे

नवी मुंबई : दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनानिमत्त फिरायला अथवा गावी गेलेल्या नवी मुंबईवासीयांचे चांगलेच दिवाळे निघाले आहे. या सुटीच्या हंगामात शहारात 12 घरफोडीच्या घटना घडल्या असून यातून चोरटय़ांनी तब्बल 13 लाखांचा ऐवज चोरून नेला. वाढत्या घरफोडींमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 
दिवाळीनिमित्त शाळा आणि महाविद्यालयांना दिर्घ सुटी असल्याने कुटुंबियांसमवेत मूळगावी जाणा-यांचे प्रमाण जास्त असते.  मात्र त्यांच्याकडून दागदागिने, रोख रक्कम आणि किमती वस्तू घरातच ठेवल्या जातात. त्यामुळे दिवाळीच्या दरम्यान घरफोडी आणि दरोडय़ाच्या घटना घडतात. यातील बहुतांश घटना बंद घरांचे कुलुप तोडून केल्या जातात. घराच्या सुरक्षेची योग्य ती खबरदारी न घेतल्याने चोरटय़ांसाठी सुटीचा हंगाम सुगीचा ठरतो. तर इमारतींचे सुरक्षा रक्षक आणि पोलीस यांच्या कार्यक्षमतेवरही यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नवी मुंबईत गेल्या तीन आठवडय़ांत 12 घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. यात सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा 12 लाख 98 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. पोलीसांकडून रात्रीची गस्त घातली जात असतानाही घरफोडींच्या घटना वाढत आहे.  
सुट्टीमध्ये गावी जाताना नागरीकांनी घराच्या सुरक्षेची खबरदारी कशा प्रकारे घ्यावी यासंदर्भात पोलीसांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे. मात्र त्यानंतरही घराची सुरक्षा वा-यावर सोडून अनेकजण गावी जातात. याच संधीचा गैरफायदा घेत या सर्व घरफोडय़ा झालेल्या आहेत. एपीएमसी आणि वाशी या दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये घरफोडीचे प्रमाण अधिक आहे. (प्रतिनिधी)
 
एपीएमसी पोलिस ठाणो हद्दिमध्ये चार घरफोडय़ा घडल्या आहेत. त्यामध्ये एकूण 2 लाख 63 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे.
वाशी पोलिस ठाणो हद्दीत
घडलेल्या तीन घटनांमध्ये 1 लाख 96 हजार रुपये किमतीचा माल चोरीला गेला आहे.
खारघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच घरफोडीमध्ये 3 लाख 5क् हजार रुपयांचा ऐवज चोरला.
 
गुन्हेगारांना शोधण्यास अपयश
च्शहरात आतार्पयत झालेल्या 12 घरफोडय़ांपैकी एकाही घटनेची उकल करण्यास नवी मुंबईतील पोलीस यंत्रणोला अपयश आले आहे. 
च्दरम्यान अनेक इमारतींमध्ये आवश्यकता असूनही सुरक्षारक्षक नेमले नसल्याने त्या ठिकाणी होणा-या घरफोडय़ांनी पोलीसांची डोकेदुखी वाढवलीआहे. त्यामुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
पोलीस घरफोडीच्याचोरलेला  ऐवज
ठाणोघटना(रुपयांत)
एपीएमसी 42 लाख 63 हजार 
वाशी31 लाख 96 हजार 
खारघर13 लाख 5क् हजार
नेरुळ135 हजार
तळोजा 11 लाख 13 हजार
एनआरआय 12 लाख 98 हजार 
पनवेल1 45 हजार 

 

Web Title: Vacation busted bust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.