निवडणुकीत ‘ट्रू व्होटर’चा वापर

By Admin | Updated: March 5, 2017 02:51 IST2017-03-05T02:51:55+5:302017-03-05T02:51:55+5:30

पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. या निवडणुकीत ट्रू व्होटर या संगणकीकृत प्रणालीचा वापर होणार आहे. या सॉफ्टवेअरमध्ये

The use of TrueVotar in the elections | निवडणुकीत ‘ट्रू व्होटर’चा वापर

निवडणुकीत ‘ट्रू व्होटर’चा वापर

- वैभव गायकर, पनवेल
पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. या निवडणुकीत ट्रू व्होटर या संगणकीकृत प्रणालीचा वापर होणार आहे. या सॉफ्टवेअरमध्ये नामनिर्देशित पत्र भरणे, कंट्रोल चार्ट, मतदार यादीसंदर्भात हरकती, सूचना, निवडणुकीचा दैनंदिन खर्च आदी माहिती उपलब्ध आहे. यासंदर्भात वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पालिकेच्या वतीने विशेष कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. सॉफ्टवेअरसंदर्भात माहिती मिळविण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी नाट्यगृहात मोठी गर्दी केली होती. निवडणूक प्रक्रिया सोपी, पारदर्शी व्हावी, या उद्देशाने ‘ट्रू व्होटर’ हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. मतदार याद्या, मतदारांची माहिती, बूथचा पत्ता, उमेदवारांची ओळख, विवरण पत्र आदींची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
नुकत्याच राज्याच्या १० महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला. नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात सर्वप्रथम पालिका कर्मचाऱ्यांना सॉफ्टवेअरबद्दल माहिती देण्यात आली. त्यानंतर उपस्थित राजकीय पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांना याबद्दल माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

निवडणुकीच्या काळातील गोंधळ या सॉफ्टवेअरमुळे नक्कीच कमी होऊन पारदर्शक व पेपरलेस पद्धतीने काम पार पडेल. या व्यतिरिक्त उमेदवारांबद्दलदेखील मतदारांना एका क्लिकवर माहिती मिळणार आहे. मोबाइलधारकांची संख्या मोठी असल्याने या सॉफ्टवेअरचा वापर मतदार नक्कीच करतील.
- मंगेश चितळे,
उपायुक्त,
पनवेल महानगरपालिका

Web Title: The use of TrueVotar in the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.