शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये गॅरेजला लागलेल्या आगीत दोन ट्रेलरसह लाखोंची मालमत्ता भस्मसात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 20:33 IST

जासई हद्दीतील अश्विनी लॉजिस्ट्रिकच्या दोन गॅरेजला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. आगीत गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेले दोन ट्रेलर्स आणि टायर जळून खाक झाले.

उरण : जासई हद्दीतील अश्विनी लॉजिस्ट्रिकच्या दोन गॅरेजला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. आगीत गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेले दोन ट्रेलर्स आणि टायर जळून खाक झाले. अग्निशामक दलाच्या दोन बंबाने दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. आगीत जीवितहानी झाली नसून आर्थिक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याची माहिती उरण तहसीलदार कविता गोडे यांनी दिली.जासई ग्रामपंचायतीच्या हद्दीत अश्विनी लॉजिस्ट्रिक कंपनी आहे. कंपनीचे दोन गॅरेज आहेत. दोन्ही गॅरेजमध्ये वाहने दुरुस्ती आणि ट्रेलर दुरुस्तीचे काम केले जाते. गॅरेजमध्ये मोठ्या प्रमाणात टायर आणि तत्सम वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. सोमवारी गॅरेज शेजारी असलेल्या गवताला लागलेल्या आगीमुळे गॅरेजला आग लागली. पाहता पाहता आगीने उग्र रुप धारण केले. गॅरेजमध्ये असलेले टायर आणि दोन ट्रेलर्स आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यामुळे आग आणखीनच भडकली.कानठल्या उठविणा-या स्फोटाचे आवाज आणि धुराच्या लोळाने परिसरात घबराट पसरली. पोलीस महसूल विभागाला माहिती मिळताच आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सिडको आणि जेएनपीटीच्या दोन बंबाने दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र तरीही आगीच्या नेमक्या कारणांचा शोध सुरू असल्याचे उरण पोलिसांकडून सांगण्यात आले.