शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

पनवेल पालिकेच्या सभेत अभूतपूर्व गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 2:14 AM

पनवेल महानगरपालिकेची दि. २१ रोजी पार पडलेली तहकूब महासभा पुन्हा एकदा गोंधळाने गाजली. सत्ताधारी भाजपा नगरसेवकांनी स्वच्छ सर्वेक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करीत

पनवेल : पनवेल महानगरपालिकेची दि. २१ रोजी पार पडलेली तहकूब महासभा पुन्हा एकदा गोंधळाने गाजली. सत्ताधारी भाजपा नगरसेवकांनी स्वच्छ सर्वेक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करीत, प्रशासन झोपा काढत असल्याचा आरोप केल्यानंतर संतापलेल्या आयुक्तांनी सभात्याग केला. विशेष म्हणजे, प्रशासकीय अधिकारी उपस्थित नसल्याने विरोधकांनीही या वेळी सभात्याग केला.शनिवारी तहकूब झालेली महासभा बुधवारी पुन्हा सुरू झाली. खारघरचे पालिका अधिकारी श्रीराम हजारे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केली. हजारे यांची चौकशी करून त्यांचे म्हणणे सभागृहात उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी मांडले. मात्र, सत्ताधाºयांनी त्यांना सभागृहात बोलावून उत्तर देण्याची मागणी केली. या वेळी हजारे यांनी आपली बाजू मांडली. मात्र, हजारे खोटे बोलत असल्याचे सांगत त्यांची तत्काळ बदली करण्याची मागणी भाजपा नगरसेवकांनी केल्यानंतर महापौरांनी तसे आदेश या वेळी दिले. विशेष म्हणजे, या विषयावर सुमारे एक ते दीड तास चर्चा झाली. शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी पुन्हा एकदा थकित एलबीटी वसुलीचा मुद्दा उपस्थित करत पालिकेच्या मार्फत एलबीटीधारकांची योग्य माहिती दिली जात नसल्याचा आरोप केला. एकूण ३३८ एलबीटीधारकांची यादी मिळाली आहे. मात्र, कोणावर किती एलबीटी थकित आहे. यासंदर्भात योग्य माहिती देण्यात आली नसल्याचे सांगितले. शिवजंयतीच्या दिवशी शहरातील राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची योग्य साफसफाई झाली नसल्याचा आरोप जगदिश गायकवाड यांनी केला. या महासभेत पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपा नगरसेवकांनी प्रशासनामार्फत कामे होत नसल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे, स्वच्छ सर्वेक्षणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप सभागृहनेते परेश ठाकूर व नगरसेवक नीलेश बाविस्कर यांनी केला.पालिकेच्या अद्याप पार पडलेल्या महासभेत घेण्यात आलेल्या एकूण ११८ ठरावांपैकी किती ठरावांची अंमलबजावणी झाली. याची माहिती देण्याची मागणी भाजपा नगरसेवक नितीन पाटील यांनी केली. या महासभेत अद्याप स्वच्छ सर्वेक्षणावर किती खर्च झाला आहे. चकाचक पनवेल कुठे आहे? स्वच्छतेच्या नावाखाली बोगसगिरी सुरू असल्याचे सांगत सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केला. या वेळी स्थायी समिती सभापती यांनी प्रशासन झोपा काढत असल्याचा आरोप केला. वारंवार प्रशासनाला टारगेट करत असल्याचे सांगत पालिकेच्या अधिकाºयांसह सभात्याग केला. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सत्ताधारी मनमानी करत असून विरोधी पक्षातील सदस्यांना बोलण्याची संधी देत नसल्याचा आरोप केला. विषयपत्रिकेवरील विषय सोडून मुद्दामहून सत्ताधारी सभागृहाचा वेळ वाया घालत असल्याचे संगितले.विरोधकांचाही सभात्यागसत्ताधारी भाजपा सदस्यांच्या मार्फत मुद्दामहून प्रशासनावर आरोप करून पटलावर असलेल्या विषयांवर चर्चा न करता, सभागृहाचा वेळ वाया घालवला जातो. आयुक्तांनी सभात्याग केल्यानंतर प्रशासनाच्या मार्फत उत्तर देण्यास कोणीच अधिकारी उपस्थित नसल्याने या वेळी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. सत्ताधारीच विकासकामांना अडथळा घालत असल्याचा आरोप त्यांनी केला.प्रशासनाच्या विरोधात असंसदीय भाषा वापरत असल्याने सभात्यागसत्ताधारी भाजपा नगरसेवकांच्या वतीने असंसदीय भाषा व सततचे आरोप केल्यामुळे आयुक्तांसह सर्व अधिकाºयांनी सभात्याग केला असल्याचा खुलासा उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी केला. प्रशासनाला घेऊन सभागृह चालविण्याची आवश्यकता असताना, तसे न केल्यामुळेच सभात्याग करण्यात आला असल्याचे उपायुक्तांनी स्पष्ट केले.