खारघरमध्ये बेवारस वाहनांचा लिलाव

By Admin | Updated: February 26, 2016 04:18 IST2016-02-26T04:18:23+5:302016-02-26T04:18:23+5:30

खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बेवारस वाहनांचा लिलाव लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एम. पाटील यांनी दिली.

Unmanned vehicles in Kharghar | खारघरमध्ये बेवारस वाहनांचा लिलाव

खारघरमध्ये बेवारस वाहनांचा लिलाव

पनवेल : खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बेवारस वाहनांचा लिलाव लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एम. पाटील यांनी दिली.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत २००८ पासून बेवारस पडलेली ४४ वाहने मूळ मालकास परत देण्यासाठी आवारात ठेवण्यात आली होती. त्यापैकी जी वाहने पडताळणी करून, मूळ मालकांचा शोध घेऊनही ते न सापडल्याने बेवारस अवस्थेत अनेक वर्षे पडून आहेत. अशा वाहनांची प्रत्यक्ष लिलावापूर्वीची प्रक्रि या पार पडली असून लिलाव केला जाणार आहे.
यातील कोणाची वाहने चोरीस गेलेली असल्यास अगर अपघातग्रस्त होऊन नादुरु स्त झालेली असल्यास ती वाहने घेऊन जावयाचे असल्यास त्याबाबत सक्षम कागदोपत्री पुरावे खारघर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एम. पाटील यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. अनेकदा वाहने चोरून चोरी-दरोड्यासाठी त्यांचा गैरवापर केला जातो.
स्क्रॅपमधील वाहन विकत घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींनी खारघर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Unmanned vehicles in Kharghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.