नवी मुंबईत अज्ञात तरुणीची गळा चिरून हत्या, मृतदेहाचे तुकडे भरले बॅगेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 05:07 IST2017-08-01T05:06:58+5:302017-08-01T05:07:48+5:30
एका २५ वर्षीय अज्ञात तरुणीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी या तरुणीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते बॅगेत भरून, त्याची पामबीच मार्गावरील करावे गावानजीक विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार
_201707279.jpg)
नवी मुंबईत अज्ञात तरुणीची गळा चिरून हत्या, मृतदेहाचे तुकडे भरले बॅगेत
नवी मुंबई : एका २५ वर्षीय अज्ञात तरुणीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी या तरुणीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते बॅगेत भरून, त्याची पामबीच मार्गावरील करावे गावानजीक विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एनआरआय पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन, अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पामबीच मार्गावरील करावेजवळच्या खाडी किनाºयावर पोलिसांना बुधवारी सकाळी एक बेवारस सुटकेस आढळून आली. या सुटकेसमध्ये छिन्नविछिन्न अवस्थेतील एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाचे मुंडके धडापासून वेगळे करण्यात आले होते. एनआयआय पोलिसांनी सदर मृतदेह ताब्यात घेऊन, या प्रकरणी अज्ञात मारेकºयांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील पुढील तपास करीत आहेत. मयत तरुणी २0 ते २५ वर्षांची असून, उंची ४ फूट ८ इंच इतकी आहे. रंग गोरा, सरळ नाक आणि गुलाबी रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाचा पायजमा असा पेहराव आहे. या तरुणीला ओळखणाºयांनी पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.