शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 09:22 IST

नवी मुंबईत कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या करुन स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला.

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत पत्नीची हत्या करुन पतीने आत्महत्या केल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी खारघरमध्ये पाकिस्तान आणि भारतात राहण्याच्या वादातून पत्नीचा खून करुन स्वतः आत्महत्या केली होती. त्यानंतर आता कोपरखैरणे भागातही पत्नीची हत्या करुन पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला.  ३८ वर्षीय बेरोजगार पतीने पत्नीची हत्या करुन स्वतःचे मनगट कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी एगुन्हा दाखल केला आहे.

बुधवारी सकाळी कोपरखैरणे येथील सेक्टर-१९ मध्ये ही घटना घडली. आरोपी गणेश मारुती शिरसाट याने घरगुती भांडणात त्याची ३४ वर्षीय पत्नी गौरी शिरसाट हिच्यावर चाकूने वार केले आणि तिची हत्या केली. या क्रूर कृत्यानंतर गणेशने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या गणेशला मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.  आरोपी गणेश शिरसाट हा पत्नीच्या चरित्र्यावरून संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद झाल्याचे म्हटलं जात आहे.

गणेश आणि गौरी हे त्यांच्या दोन मुलांसह जय अंबे इमारतीत राहत होते. गौरी एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती, तर गणेश बेरोजगार होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते आणि त्याच वादातून गौरीची हत्या झाली. वारंवार फोन करुनही न उचलल्याने गौरीची मैत्रिण वैशाली पाटील तिच्या घरी गेली होती. दुपारी १२:३० च्या सुमारास घरात प्रवेश केल्यावर वैशालीला गौरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आणि गणेश तिच्या शेजारी जखमी अवस्थेत आढळला. तिने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही रुग्णालयात ने. गौरीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तर गणेशविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरगुती वादातून हा गुन्हा घडल्याचे दिसून येत आहे. गणेशची प्रकृती स्थिर झाल्यानंतर, त्याला अटक करून अधिक चौकशी केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस