युद्धाच्या छायेखाली फळांचा राजा अमेरिका, युरोपला रवाना! गतवर्षीचा आकडा भक्कम

By नामदेव मोरे | Updated: April 10, 2026 11:50 IST2026-04-10T11:49:33+5:302026-04-10T11:50:36+5:30

अडथळे न आल्यास एप्रिलअखेरपर्यंत निर्यात वाढण्याची शक्यता

Under the shadow of war, the king of fruits leaves for America, Europe! Last year's figures are strong | युद्धाच्या छायेखाली फळांचा राजा अमेरिका, युरोपला रवाना! गतवर्षीचा आकडा भक्कम

युद्धाच्या छायेखाली फळांचा राजा अमेरिका, युरोपला रवाना! गतवर्षीचा आकडा भक्कम

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: खराब हवामानामुळे उत्पादनात झालेली घट आणि आखाती देशांमधील युद्धजन्य स्थितीचा दुहेरी फटका यंदा आंबा निर्यातीला बसला आहे. एप्रिलमध्ये आवक वाढू लागल्याने अमेरिकेसह युरोपीय देशांमध्ये आता निर्यात सुरू झाली असली, तरी आखाती बाजारपेठ अजूनही पूर्णपणे सावरलेली नाही. युद्धविरामानंतर काही निर्यातदारांनी व्यावसायिक धोका पत्करून कुवेतसह आखाती देशांकडे हवाईमार्गे मर्यादित निर्यात सुरू केली आहे. अडथळे न आल्यास एप्रिलअखेरपर्यंत निर्यात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गतवर्षीचा आकडा भक्कम

गतवर्षी ४५ देशांत ३३,३३० टन आंब्याची निर्यात झाली होती. या माध्यमातून  ४९६.५६ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यंदा मात्र युद्धामुळे मध्यपूर्वेतील बाजारपेठ काही काळ ठप्प झाली. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये निर्यात सुरळीत सुरू आहे. वाशी येथील केंद्रात विकिरण व प्रक्रिया सुविधांमुळे निर्यात सुलभ आहे.

अमेरिका व युरोपकडे आंबा निर्यात सुरू आहे. जास्तीत जास्त निर्यातीसाठी सुविधा आहेत, अशी माहिती पणन मंडळाचे व्यवस्थापक यांनी दिली. तर,  आखाती देशांतील परिस्थितीमुळे सध्या स्थानिक बाजारावर भर आहे. हवाईमार्गे मर्यादित निर्यात सुरू झाली आहे, असे निर्यातदार मोहन डोंगरे यांनी दिली.

Web Title : युद्ध के बीच अमेरिका, यूरोप में आम का निर्यात शुरू

Web Summary : उत्पादन में गिरावट और मध्य पूर्व में तनाव के बावजूद, अमेरिका और यूरोप में आम का निर्यात शुरू हो गया है। पिछले साल का निर्यात आंकड़ा मजबूत था, 33,330 टन निर्यात किया गया। खाड़ी देशों के लिए सीमित हवाई निर्यात जारी है, जल्द ही निर्यात बढ़ने की उम्मीद है। स्थानीय बाजार फिलहाल फोकस में हैं।

Web Title : Mango Exports to US, Europe Resume Amidst War Concerns

Web Summary : Despite production dips and Middle East tensions, mango exports to America and Europe have started. Last year's export figures were strong, with 33,330 tons exported. Limited air exports to Gulf countries are ongoing, hoping for increased exports soon. Local markets are currently a focus.