शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

पारसिक टेकडीच्या सौंदर्याला अनधिकृत झोपड्यांचा विळखा

By नामदेव मोरे | Updated: June 22, 2023 11:33 IST

रेल्वेबोगद्याजवळ अतिक्रमण : भूमाफियांवर कारवाईकडे दुर्लक्ष

नवी मुंबई : निसर्गाचे वरदान लाभलेल्या पारसिक टेकडी परिसराला झोपड्यांचा विळखा पडला आहे. रेल्वे बोगद्याच्या दोन्ही बाजूंकडून डोंगरउतारावर झोपड्यांचा विळखा घट्ट हाेत असून, २००पेक्षा जास्त बांधकामे झाली आहेत. पायथ्यापासून विश्वनाथ महाराज समाधी मंदिरापर्यंत अतिक्रमणे वाढत असून, कोट्यवधी रुपयांचे भूखंड भूमाफियांनी गिळंकृत केल्यानंतरही प्रशासनाने ठोस कारवाई करण्याऐवजी कानाडोळा केल्याने संताप व्यक्त होत आहे. 

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये अनधिकृत झोपड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एमआयडीसीमध्ये दिघा, अडवली भुतावलीपासून ते थेट नेरूळपर्यंत मोकळ्या भूखंडावर झपाट्याने झोपड्यांचे बांधकाम केले जात आहे. एमआयडीसीबरोबर आता सिडकोच्या जमिनीवरही झोपड्यांचे बांधकाम सुरू आहे.  पावसाळ्यात पालिका व सिडकोचे अतिक्रमणविरोधी पथक कारवाई करत नसल्याचा गैरफायदा घेऊन जमीन हडप केली जात आहे. 

रेल्वे रुळांवर झोपड्या कोसळल्या तर....    रेल्वेच्या पारसिक बोगद्याच्या दोन्ही बाजूला डोंगर उतारावर २००पेक्षा जास्त झोपड्यांचे बांधकाम केले आहे. नवीन झोपड्यांचे बांधकामही वेगाने सुरू आहे.     शहाबाज गावातील दफनभूमीला लागून असलेल्या भूखंडावर डोंगराच्या पायथ्यापर्यंत बांधकाम केले आहे.     यामुळे टेकडीवरील निसर्गाचा ऱ्हास होऊन परिसर बकाल होत आहे. शिवाय पावसाळ्यात रेल्वे रुळांवर झोपड्या कोसळल्या तर गंभीर अपघाताची भीती आहे.     मात्र, या अतिक्रमणाविरोधात सिडको व महानगरपालिकेचे अधिकारी ठोस कारवाई करत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

कोट्यवधीचे भूखंड गिळंकृत पारसिक परिसरातील भूखंडांची किमत कोट्यवधी रुपये आहे. अत्यंत मोक्याच्या जागेवर असलेल्या टेकडी पायथ्यावरील कोट्यवधींच्या जमिनीवर झोपड्यांचे अतिक्रमण झाले असून, ते काढण्याकडे सिडको दुर्लक्ष करत आहे.

तोडलेल्या झोपड्या पुन्हा उभारल्यापारसिक टेकडीच्या पायथ्याशी शहाबाजगावातील दफनभूमीला लागूनही असलेल्या झोपड्यांवर एक महिन्यापूर्वी बेलापूर विभाग कार्यालयाने कारवाई केली होती. परंतु, कारवाई केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा त्या उभारण्यात आल्या. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई