निवडणुका संपताच अनधिकृत होर्डिंगबाजी
By Admin | Updated: October 22, 2014 01:19 IST2014-10-22T01:19:34+5:302014-10-22T01:19:34+5:30
निवडणूक निकालानंतर शहरात अनधिकृत होर्डिंगबाजी सुरू झाली आहे.शहराचे विदु्रपीकरण होत असून महापालिका प्रशासनही याकडे दुर्लक्ष करत आहे.

निवडणुका संपताच अनधिकृत होर्डिंगबाजी
नवी मुंबई : निवडणूक निकालानंतर शहरात अनधिकृत होर्डिंगबाजी सुरू झाली आहे. शहराचे विदु्रपीकरण होत असून महापालिका प्रशासनही याकडे दुर्लक्ष करत आहे.
आचारसंहिता काळात प्रशासनाने शहरातील अनधिकृत होर्डिंग हटविले होते. सर्व उमेदवारांनी परवानगी घेवून होर्डिंग लावल्याने महापालिकेस जवळपास ९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. परंतु निवडणुका संपताच पुन्हा अनधिकृत होर्डिंगबाजी सुरू झाली आहे. शहरात भाजपाच्या विजयी उमेदवार मंदा म्हात्रे, कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, ऐरोलीमधील भाजपाचे उमेदवार वैभव नाईक यांच्या नावाचे होर्डिंग्ज दिसू लागले आहेत. यासाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)