शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

घणसोलीत अनधिकृत फेरीवाल्यांना मिळतेय अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 1:44 AM

पालिकेकडे हस्तांतरित झालेल्या घणसोली विभागात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अनधिकृत फेरीवाल्यांनी परिसरातील रस्ते, नाल्यालगतची मोकळी जागा व्यापली आहे.

नवी मुंबई : पालिकेकडे हस्तांतरित झालेल्या घणसोली विभागात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अनधिकृत फेरीवाल्यांनी परिसरातील रस्ते, नाल्यालगतची मोकळी जागा व्यापली आहे. अशातच मोकळ्या मैदानावर आठवडी बाजारही भरू लागले असून, त्याठिकाणी शहराबाहेरील फेरीवाले बसू लागले आहेत.फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे यामुळे शहराच्या प्रतिमेला गालबोट लागत आहे. नेरुळ, वाशीपाठोपाठ घणसोली परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य निर्माण होत चालले आहे. वेळीच त्यांच्यावर कारवाई न झाल्यास भविष्यात या अनधिकृत फेरीवाल्यांना पोसण्याची जबाबदारी प्रशासनाला घ्यावी लागेल अशी टीकाही होत आहे. घणसोली रेल्वेस्थानकासमोरील मार्ग, सिम्प्लेक्स वसाहतीलगतचे रस्ते व मोकळे मैदान याठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. यासंदर्भात अनेकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र कारवाईच्या काही मिनिटे अगोदर फेरीवाले त्याठिकाणावरुन उठून गेलेले असतात. यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईत पारदर्शकता नसल्याचा आरोप मनसे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वी सिडको व पालिकेने सिम्प्लेक्सलगतच्या मैदानावरील धार्मिक स्थळावर रात्रीच्या वेळी कारवाई केली होती. या कारवाईनंतर त्याच मैदानावर व पदपथावर दर बुधवारी आठवडी बाजार भरत आहे. मुंबईच्या विविध भागासह पनवेल व इतर परिसरातील फेरीवाले त्याठिकाणी व्यवसायासाठी येत आहेत. त्यांच्यावर मात्र कारवाईत होत नसल्याने आठवडी बाजाराला नेमका कोणाचा आशीर्वाद ? असा प्रश्न गलुगडे यांनी उपस्थित केला आहे. अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.घणसोली रेल्वेस्थानकासमोरील रहदारीच्या मुख्य मार्गावर संध्याकाळी मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले बसलेले असतात. त्यापैकी वडापाव अथवा इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून उघड्यावर गॅस सिलिंडरचा वापर होत आहे. त्यामुळे भविष्यात त्याठिकाणी सिलिंडरचा स्फोट होवून दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. या फेरीवाल्यांना अर्थपूर्ण पाठबळ लाभत असल्याचा आरोप भाजपा महामंत्री कृष्णा पाटील यांनी केला आहे. त्यामुळेच सदरचा मार्ग कायमस्वरुपी फेरीवालामुक्त केला जात नसल्याचाही त्यांचा आरोप आहे. तर प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे अनधिकृत टपºयांच्या बाहेरची जागा देखील भाड्याने दिली जात आहे. अशा ठिकाणांवर देखील कारवाईला होत नसल्याने घणसोली नोड अनधिकृत फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडला आहे.

टॅग्स :hawkersफेरीवाले