अनधिकृत बांधकामामुळे पेशवेकालीन गोवर्धनी मातेच्या मंदिराला धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 04:00 PM2023-07-23T16:00:31+5:302023-07-23T16:01:04+5:30

सदर कुठल्याही प्रकारचा मंदिराला धोका निर्माण झाल्यास व दुर्घटना घडल्यास याला विकासक हा सर्वस्वी जबाबदार राहील, असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी शनिवारी आपत्कालीन आढावा बैठकीत सांगितले.

Unauthorized construction threatens Peshwa-era Govardhani Mata temple, belapur, navi mumbai | अनधिकृत बांधकामामुळे पेशवेकालीन गोवर्धनी मातेच्या मंदिराला धोका

अनधिकृत बांधकामामुळे पेशवेकालीन गोवर्धनी मातेच्या मंदिराला धोका

googlenewsNext

नवी मुंबई : बेलापूर किल्ले गावठाण येथे पेशवेकालीन आई गोवर्धनी मातेचे मंदिर आहे या मंदिरात बाराही महिने नवी मुंबई, ठाणे, रायगड, भिवंडी, पालघर अशा विविध जिल्ह्यामधून भाविक भक्त दर्शनला येत असतात. तसेच नवरात्रोत्सवात या मंदिरात नऊ दिवस मोठे उत्सव साजरे केले जातात. परंतु मंदिराच्या पायथ्याशी काही काळात विकासकांनी अनधिकृत बांधकाम केल्याने त्या इमारतींच्या खोदकामात प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आल्यामुळे विकासकांनी कुठल्याही प्रकारची संरक्षण भिंत न बांधल्यामुळे मंदिराच्या पायथ्यापासून व मंदिराच्या मुख्य दरवाजा पर्यंतचा काही मातीचा भाग पावसामुळे ढासळला आहे. त्यामुळे मंदिराच्या पायऱ्या व मंदिराच्या दरवाजाचा मुख्य भाग पडून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही व सदर कुठल्याही प्रकारचा मंदिराला धोका निर्माण झाल्यास व दुर्घटना घडल्यास याला विकासक हा सर्वस्वी जबाबदार राहील, असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी शनिवारी आपत्कालीन आढावा बैठकीत सांगितले.

महाराष्ट्राचे राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री ठाणे जिल्हा शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षेतेखाली अतिवृष्ट, महापुराचे नियोजन व उपाययोजना करण्याबाबत आढावा बैठक शनिवारी ठाणे येथील जिल्हाधिकारी नियोजन भवन येथे  झाली. त्यात त्यांनी ही माहिती दिली. यावेळी, म्हात्रे यांनी सांगितले की, प्रथमतः नवी मुंबईत सिडको, नवी मुंबई महानगरपालिका व एमआयडीसी अशी तीन प्राधिकरणे असल्यामुळे प्रामुख्याने एमआयडीसी भाग हा पूर्णतः दगडखाणीने व्यापले असून तिथे डोंगरांच्या खालील भाग संपूर्ण झोपडपट्टीने भरलेले असल्यामुळे तिथे नेहमी पावसळ्यात दिवसा व रात्री दुर्घटना होत असतात. तसेच त्या ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा व उपायोजना उपलब्ध करून देण्यात याव्या व विशेषतः त्या ठिकाणी रात्री पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी व पालिकेच्या मार्फत सदर ठिकाणी आपत्कालीन चौकी किंवा तात्पुरत्या स्वरुपात कार्यालय उभारले तर त्या ठिकाणातील नागरिकांना योग्य ती मदत मिळण्यास सोप होईल.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, नवी मुंबईत धोकादायक इमारतींची संख्या जास्त असल्याने या अति पावसामुळे दुर्घटना होऊ शकते त्यामुळे सदर इमारतीमधील नागरीकांना वेळीच इमारत खाली करण्यास महापालिकेद्वारे नोटीस देण्यात यावी व त्यांची योग्य त्या सर्व सुविधायुक्त ठिकाणी त्यांना स्थलांतर करण्यात यावे. तसेच नवी मुंबईमध्ये संक्रमण शिबीर न राबविल्यामुळे जसे जिमी टॉवर ची दुर्घटना झाली त्यावेळेस आम्ही नागरिकांना नवी मुंबईमध्ये जेवढे भवन आहेत त्यामध्ये भवन आम्ही स्थलांतर केले व त्या इमारतीमधील काही उच्चबृह नागरिक आहेत ते कुठे राहण्यास तयार होत नाही. त्यामुळे अशा काही धोकादायक इमारती आहेत त्या खाली करण्यास नागरिक तयार होत नाही तसेच महापालिकेमार्फत त्यावरील लवकरात लवकर राहण्याची उपायोजना करून सदरच्या धोकादायक इमारती खाली करण्यात यावी असे त्यांनी सांगितले.

बैठकीस ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, विभागीय तहसीलदार,  विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे, आमदार किसन कथोरे, आमदार राजू पाटील, आमदार गीता जैन, आमदार संजय केळकर तसेच संबंधित विभागातील पोलीस आयुक्त, विभागीय महापालिका आयुक्त, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Unauthorized construction threatens Peshwa-era Govardhani Mata temple, belapur, navi mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.