उलवे टेकडीची उंची ८ मीटरने कमी
By Admin | Updated: May 12, 2017 02:01 IST2017-05-12T02:01:44+5:302017-05-12T02:01:44+5:30
प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गात प्रमुख अडथळा ठरणाऱ्या उलवे टेकडीची उंची कमी करण्याच्या

उलवे टेकडीची उंची ८ मीटरने कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गात प्रमुख अडथळा ठरणाऱ्या उलवे टेकडीची उंची कमी करण्याच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. गेल्या आठवड्यात संबंधित कंत्राटदाराला या कामाच्या वर्कआॅर्डर देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कंत्राटदाराने कामाच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे.
उलवा टेकडीची उंची ९२ मीटर असून विमानतळाच्या धावपट्टीच्या मार्गात अडथळा ठरत आहे. त्यामुळे या टेकडीची उंची आठ मीटरने कमी करावी लागणार आहे. गेल्या वर्षी या कामासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. परंतु दुसऱ्या टप्प्यातील पर्यावरण मंत्रालयाच्या मंजुरीअभावी हे काम रखडले. मात्र गेल्या महिन्यात पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविल्याने टेकडीची उंची कमी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.