उल्हासनगरला दोन कोटींची लॉटरी; एलबीटी अनुदान साडेबारा कोटी!

By Admin | Updated: January 4, 2016 01:58 IST2016-01-04T01:58:21+5:302016-01-04T01:58:21+5:30

महापालिकेला राज्य सरकारकडून एलबीटी अनुदानात घसघसीत दोन कोटींची वाढ होऊन १२ कोटी ५९ लाखांचा निधी दरमहा मिळणार आहे.

Ulhasnagar gets two crore lottery; LBT subsidy crores! | उल्हासनगरला दोन कोटींची लॉटरी; एलबीटी अनुदान साडेबारा कोटी!

उल्हासनगरला दोन कोटींची लॉटरी; एलबीटी अनुदान साडेबारा कोटी!

सदानंद नाईक,  उल्हासनगर
महापालिकेला राज्य सरकारकडून एलबीटी अनुदानात घसघसीत दोन कोटींची वाढ होऊन १२ कोटी ५९ लाखांचा निधी दरमहा मिळणार आहे. आयुक्त मनोहर हिरे, उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या प्रयत्नाना अखेर यश आले आहे.
उल्हासनगर पालिकेला जकातीपासून दरमहा १६ कोटीचे उत्पन्न मिळत असतांना एलबीटी लागू झाल्यावर उत्पन्न ८ कोटीवर घसरले होते. एलबीटीच्या कमी उत्पन्नामुळे पालिकेला दोन वर्षात २०० कोटींचे नुकसान झाले आहे.
आयुक्त मनोहर हिरे यांनी कमी उत्पन्न मिळाल्याचा ठपका कर्मचारी व अधिकारी यांच्यावर ठेवून १६ जणांना निलंबित तर ५० जणांना कारणे दाखवा नोटीसा दिल्या आहेत. एलबीटी बंद केल्यावर शासनाने उल्हासनगर महापालिकेला१० कोटी ३० लाखांचे अनुदान दिले. हिवाळी अधिवेशनानंतर पालिकेच्या अनुदानात सव्वादोन कोटींची वाढ शासनाने केली आहे.
महापालिका जकातीच्या उत्पन्नाएवढे अनुदान शासनाने दिल्यास १८ कोटींपेंक्षा जास्त अनुदान मिळण्याची शक्यताही आयुक्त मनोहर हिरे यांनी व्यक्त केली आहे. एप्रिल महिन्यात अनुदानात बदल होणार असून पालिकेला १८ कोटींंपेक्षा जास्त एलबीटी अनुदान मिळण्यासाठी पाठपुरावा करीत असल्याची माहिती विभागाचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे. पालिकेचे उत्पन्न मर्यादीत असल्याने शहर विकास मंदावला असल्याची प्रतिक्रिया उपमहापौर पंचशिला पवार यांनी दिली आहे.

Web Title: Ulhasnagar gets two crore lottery; LBT subsidy crores!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.