ढिसाळ कामाविरोधात लाक्षणिक उपोषण

By Admin | Updated: August 4, 2016 02:06 IST2016-08-04T02:06:54+5:302016-08-04T02:06:54+5:30

नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी अनेकदा पत्र पाठवून लक्ष वेधूनही पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष चालविले आहे.

Typical fasting against loose conduct | ढिसाळ कामाविरोधात लाक्षणिक उपोषण

ढिसाळ कामाविरोधात लाक्षणिक उपोषण


उरण : उरण शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी अनेकदा पत्र पाठवून लक्ष वेधूनही पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष चालविले आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यात उनप अपयशी ठरल्याचा आरोप करीत उरण शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. शहर अध्यक्ष किरीट पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (३) आयोजित उपोषणात अनेक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
उरण शहरातील नागरिकांना अनेक समस्या भेडसावित आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांची झालेली दुरवस्था, शौचालयाची समस्या, अपुरा पाणीपुरवठा, गटार आणि आरोग्याचे प्रश्न, कासमनगर, मीना हाऊसिंग सोसायटी, पांडुरंग अपार्टमेंट, समर्थ अपार्टमेंट, बोरी, मोरा विभागातील विविध नागरी समस्यांबाबत पालिकेशी अनेकदा पत्रव्यवहारही करण्यात आलेला आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून नेहमीच उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा काँगे्रसचा आरोप आहे.
उनपने चालविलेल्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने बुधवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
उपोषणकर्त्यांची कामगार नेते महेंद्र घरत, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जे. डी. जोशी, मिलिंद पाडगावकर, माजी शहर अध्यक्ष गणेश सेवक, अय्याझ फ की, कमलाकर घरत, संध्या ठाकूर, नगरसेवक महेंद्र कांबळे, माजी नगरसेवक हेमंत पाटील आदि काँग्रेस पदाधिकाऱ्यांबरोबरच राष्ट्रवादी, शेकापच्या पदाधिकाऱ्यांनीही भेटी देवून पाठिंबा दिला असल्याची माहिती शहर अध्यक्ष किरीट पाटील यांनी दिली.
उपोषणकर्त्यांकडे नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने नागरिकांच्या समस्यांबाबत प्रशासन आणि सत्ताधारी गंभीर नसल्याचा आरोपही किरीट पाटील यांनी केला. (वार्ताहर)
>शहरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांची झालेली दुरवस्था, शौचालयाची समस्या, अपुरा पाणीपुरवठा, गटार आणि आरोग्याचे प्रश्न, कासमनगर, मीना हाऊसिंग सोसायटी, पांडुरंग अपार्टमेंट, समर्थ अपार्टमेंट, बोरी, मोरा विभागातील विविध नागरी समस्यांबाबत पालिकेशी पत्रव्यवहार झाला आहे.

Web Title: Typical fasting against loose conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.