खारघरजवळ दोन महिलांची हत्या
By Admin | Updated: October 2, 2014 00:33 IST2014-10-02T00:33:32+5:302014-10-02T00:33:32+5:30
खारघरजवळील कोपरागावातील दोन महिलांची हत्या झाली असून त्यांचे मृतदेह पनवेलजवळील बारवई गावच्या हद्दीत आढळले आहेत.

खारघरजवळ दोन महिलांची हत्या
नवी मुंबई : खारघरजवळील कोपरागावातील दोन महिलांची हत्या झाली असून त्यांचे मृतदेह पनवेलजवळील बारवई गावच्या हद्दीत आढळले आहेत. दर्शना अनिल ठाकूर (34) आणि भारती लक्ष्मण ठाकूर (18) अशी त्यांची नावे असून त्यांच्याबरोबर असलेल्या दोन वर्षाचा अथर्व सुदैवाने बचावला आहे.
दर्शना, त्यांचा मुलगा अथर्व आणि चुलत नणंद भारती हे मंगळवारी दुपारी कामानिमित्त घराबाहेर गेलेले रात्री परतलेच नाहीत. बुधवारी सकाळी बारवई गावाजवळ बंद गोल्डन हॉटेलच्या पडक्या इमारतीत दोघींचे मृतदेह आढळले. शस्त्रने वार करून हत्या केल्याची शक्यता आहे. दरम्यान, सकाळी गुरे चारण्यास गेलेल्या गावक:यांचे लक्ष रडणा:या अथर्वकडे गेले आणि हा प्रकार उघडकीस आला. यामुळे कोपरागावावर शोककळा पसरली असून नवरात्र उत्सव रद्द केला आहे. (वार्ताहर)