दुचाकीस्वारांनी सोनसाखळी हिसकावली
By Admin | Updated: August 13, 2016 03:36 IST2016-08-13T03:36:00+5:302016-08-13T03:36:00+5:30
धूमस्टाईल मोटारसायकल चालवून महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या टोळ्यांचा धुडगूस पुन्हा सुरू झाला आहे. खारघरमध्ये एक महिलेच्या गळ्यातील ७५ हजार रूपये

दुचाकीस्वारांनी सोनसाखळी हिसकावली
नवी मुंबई : धूमस्टाईल मोटारसायकल चालवून महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या टोळ्यांचा धुडगूस पुन्हा सुरू झाला आहे. खारघरमध्ये एक महिलेच्या गळ्यातील ७५ हजार रूपये किमतीची सोनसाखळी हिसकावल्याची घटना घडली आहे.
खारघर सेक्टर १९ मधील मनीषा कुणाल वानखडे या त्यांच्या सासूला घेवून मोटारसायकलवरून जात होत्या. सेक्टर १२ मधील रिलायन्स फे्रश समोरील एलजी शॉपसमोरून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी मागे बसलेल्या सासूबार्इंच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली आहे. ९ आॅगस्टला रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.