पामबीचवर दोन वाहनांचा अपघात
By Admin | Updated: October 13, 2015 02:14 IST2015-10-13T02:14:55+5:302015-10-13T02:14:55+5:30
पामबीच मार्गावर एनआरआय सिग्नलजवळ रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. एक कार रस्ता ओलांडत असताना तिला दुसरी भरधाव कार धडकल्याने हा अपघात झाला

पामबीचवर दोन वाहनांचा अपघात
नवी मुंबई : पामबीच मार्गावर एनआरआय सिग्नलजवळ रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. एक कार रस्ता ओलांडत असताना तिला दुसरी भरधाव कार धडकल्याने हा अपघात झाला. परंतु दोनही कारमधील प्रवाशांनी सीटबेल्ट लावलेला असल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
रविवारी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास पामबीच मार्गावर एनआरआय येथे दोन वाहनांमध्ये अपघात झाला. मुंबईकडून आलेली प्रवासी कार एनआरआयच्या दिशेने उजवीकडे वळत होती. यावेळी सीबीडीकडून आलेली भरधाव टवेरा त्या कारवर धडकली. यावेळी दोनही वाहने वेगात असल्याने त्यांच्याच गंभीर अपघात झाला. त्यामुळे या अपघातात दोनही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघातावेळी दोन्ही कारमध्ये प्रवासी बसलेले होते. परंतु त्यांनी सीटबेल्ट लावलेला असल्यामुळे गंभीर अपघात होऊनही कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. परंतु अपघातानंतर दोन्ही कार मार्गावरच अडकून पडल्या होत्या. त्यामुळे पाठीमागूनइतर वाहनांची त्यांना धडक बसून पुन्हा अपघाताची शक्यता होती.