मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:04 IST2017-08-03T02:04:48+5:302017-08-03T02:04:48+5:30
भरधाव वेगात दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन तिघे जखमी झाले. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकची धडक
नागोठणे : भरधाव वेगात दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन तिघे जखमी झाले. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
हा अपघात मुंबई - गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीनजीक घडला. महाडहून तळोजाकडे खत पावडर घेऊन जाणारा एमएच ०६ बी डी ३०९८ आणि राजस्थानहून रत्नागिरीकडे मार्बल घेऊन जाणारा आर. जे. २७ जीआर ९०४० हा ट्रक सुकेळीजवळ भरधाव वेगात जात असताना वेगावर नियंत्रण न राहिल्याने एकमेकांवर आदळून अपघात झाला. दोन्ही वाहनांमधील माल रस्त्यावर पसरल्याने मालाची पूर्णपणे नासधूस झाली आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातात कैलास जालम मीना (२०), ललित मीना (२४) दोघे रा. पडसाद खेडगी, राजस्थान आणि अब्दुल गफार खान (३५, रा. अटकारा, अमेथी) हे तिघेजण जखमी झाले.
जखमींवर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर एका जखमीला मुंबई, तर दुसºयांना अलिबागच्या रु ग्णालयात हलविण्यात आले आहे.
अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत ठोंबरे पुढील तपास करीत आहेत.