उरण तालुक्यात दोन बलात्काराच्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:55 IST2018-10-31T23:55:27+5:302018-10-31T23:55:43+5:30
उरण तालुक्यात दोन बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. उरण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हे दाखल असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे, तर एक जण फरार आहे.

उरण तालुक्यात दोन बलात्काराच्या घटना
उरण : उरण तालुक्यात दोन बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. उरण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हे दाखल असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे, तर एक जण फरार आहे.
उरणजवळील डाऊर नगर येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी मंगळवारी तक्रार दाखल केल्यानंतर उरण पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटक केलेल्या आरोपीचे नाव रमेश कालेल (२२) असे आहे. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे.
तर दुसरी घटना दिघोडे येथे घडली. स्वप्निल पाटील (२५) याने एका विवाहित महिलेसोबत प्रेमाचे नाटक करून तिच्या सोबत लग्न करायचे आमिष दाखवून तिला पतीपासून घटस्फोट घेण्यास भाग पाडले. तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. नंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. याबाबत पीडित महिलेने उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून स्वप्निलवर गुन्हा दाखल केला आहे. तो फरार असून त्याचा शोध सुरू आहे.