ड्रग्जची विक्री करणाऱ्या २ नायजेरियन महिलांना बेड्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 13:40 IST2018-07-01T13:38:40+5:302018-07-01T13:40:00+5:30

हॅप्पीनेस ऍगबॉखियन आणि डेस्टिनी फिलिप असे आरोपी महिलांची नावे    

Two Nigerian women arrested with drugs by taloja police | ड्रग्जची विक्री करणाऱ्या २ नायजेरियन महिलांना बेड्या 

ड्रग्जची विक्री करणाऱ्या २ नायजेरियन महिलांना बेड्या 

नवी मुंबई - तळोजा परिसरात अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोन नायजेरियन महिलांना अटक करण्यास तळोजा पोलसाना यश आले आहे . हॅप्पीनेस ऍगबॉखियन आणि डेस्टिनी फिलिप असे आरोपी महिलांची नावे आहेत.

तळोजा परिसरातील पेंधर रेल्वे फाटक परिसरात सध्या मेट्रोचे काम सुरु आहे. याठिकाणी काही महिला एमडी ड्रग्सची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती तळोजा पोलिसांना सुत्रांमार्फत  मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून होंडा स्कूटीवरुन आलेल्या दोन नायजेरियन महिलांना संशयाचा आधारावर झडती घेतली असता नायजेरियन महिलांकडून १६७ ग्रॅम मेथाक्यूनॉल आणि  ८२ ग्रॅम मस्कालिन नावाचे अमली पदार्थ आढळून आले. अंदाजे ७ लाख रुपयांचे बाजार भाव असलेले हे ड्रग्स पोलिसांनी जप्त केले आहे.या प्रकरणी तळोजा पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title: Two Nigerian women arrested with drugs by taloja police