डोंबिवली : ठाकुर्ली आणि कल्याण-शीळ रस्त्यावरून दोन मोटारसायकली चोरीला गेल्या आहेत. अजय कुलकर्णी (रा. अंकिता सोसायटी) यांची ४० हजारांची मोटारसायकल चोरीला गेली आहे. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून डोंबिवली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. दुसऱ्या घटनेत फिरोज सिद्दीकी (रा. सुनी जामा मशीद, मलंग रोड) यांची ३५ हजारांची मोटारसायकल कल्याण-शीळ रोडवरील आर.के. टेलर्स दुकानासमोरून मंगळवारी चोरीला गेली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (प्रतिनिधी )
दोन मोटारसायकली गेल्या चोरीला
By admin | Updated: November 18, 2016 02:43 IST