शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये दोन गट, 11 नगरसेवकांची अनुपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 14:39 IST

माजी मंत्री गणेश नाईक यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये दोन गट पडले आहेत.

नवी मुंबई - माजी मंत्री गणेश नाईक यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये दोन गट पडले आहेत. 11 नगरसेवक नाईकांच्या कार्यालयात अनुपस्थित राहिले असून, माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी राष्ट्रवादीमध्येच राहण्याचा निर्धार केला आहे.राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सोमवारी महापौर बंगल्यावर बैठक घेऊन पक्षाचे 52 नगरसेवक व 5 अपक्ष मिळून 57 नगरसेवक भाजपात जाणार असल्याचा दावा केला होता. सर्व नगरसेवक मंगळवारी गणेश नाईक यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना भाजपात चला, असा आग्रह करणार होते. पण मंगळवारी 11 नगरसेवक कार्यालयाकडे फिरकले नाहीत. माजी उपमहापौर अशोक गावडे व त्यांची मुलगी नगरसेविका सपना गावडे अनुपस्थित होते. गावडे यांच्याशी संपर्क साधला असता मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.कोपरखैरणेमधील नगरसेवक शंकर मोरे हेही बैठकीला गेले नाहीत. मोरे हे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे समर्थक आहेत. अपक्ष नगरसेविका सायली शिंदे याही नाईकांच्या कार्यालयात अनुपस्थित होत्या. कोपरखैरणेमधील नगरसेविका भारती पाटील या शिवसेना नेते नरेंद्र पाटील यांच्या बहीण असून, त्या नरेंद्र पाटील यांच्यासोबत राहण्याची शक्यता आहे. तुर्भेमधील दोन नगरसेविका व माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी याच्यासह त्यांचे समर्थक तीन नगरसेवकही बैठकीला नव्हते. सुरेश कुलकर्णी यांच्या आईचे निधन  झाल्याने ते आले नाहीत. त्यांचा गट गणेश नाईक यांच्या सोबत राहील, असा विश्वास नाईक समर्थकांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकNCPराष्ट्रवादी काँग्रेस